सोयाबीन पिकावरील हिरवी अमेरिकन बोंडअळीचे नियंत्रना वर मार्गदर्शन करताना कृषीकन्याचांदोरी : निफाड तालुक्यातील आहेरगांव या परिसरात लागवड झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी कृषी विभाग व के. के. वाघ कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी यांच्याकडून करण्यात आली. यामध्ये सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर हिरवी अमेरिकन बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. याचा प्रादुर्भावातून वाचिवन्यासाठी शेतकर्यांना एकात्मिक किड नियंत्रणाच्या उपाय ही सुचिवले. यामध्ये प्रामुख्याने जैविक नियंत्रण (कामगंध सापळे, प्रकाश सापळे) यांचा वापर करावा. तसेच निबोळी अर्क ?त्न याची फवारणी करावी. तसेच सोयाबीन पिकाचे दररोज निरीक्षण घेण्यास सांगितले. तसेच कृषीकन्या घंगाळे यांनी कीड नियंत्रणाचे व्यवस्थापन कसे करावे, कामगंध सापळ्यांची रचना, व्यवस्थापन आण िव्यवस्थापन करते वेळी घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन केले. कृषीकन्या घंगाळे यांना के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डा. एस. एम. हाडोळे , प्रा. टी. बी. उगले, प्रा. पी. बी पवार, प्रा. व्हि. सी. कोरडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी आहेरगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
आहेरगांव या परिसरात लागवड झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 4:54 PM
सोयाबीन पिकावरील हिरवी अमेरिकन बोंडअळीचे नियंत्रना वर मार्गदर्शन करताना कृषीकन्या चांदोरी : निफाड तालुक्यातील आहेरगांव या परिसरात लागवड झालेल्या ...
ठळक मुद्देसोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर हिरवी अमेरिकन बोंडअळीचा प्रादुर्भाव