भाजीबाजार जागेची तहसीलदारांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 06:13 PM2020-08-04T18:13:55+5:302020-08-04T18:14:27+5:30
सिन्नर :कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तथापि, 5 ऑगस्ट रोजी प्रतिबंधित क्षेत्रातील नियम शिथील होणार असून वंजारी समाज मैदान येथील भाजीपाला, फळ विक्री बाजार सामाजिक अंतर राखून पूर्वीप्रमाणे भरविला जावा यासाठी तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार यांनी मैदानाची पाहणी केली.

पावसाळा असल्याने सदर मैदानावर पडलेले पाणी मैदानाच्या खालच्या सखल भागात साचत आहे. त्यामुळे येथे चिखल होऊन नागरिक व व्यापारी वर्ग यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने मैदानाच्या पश्चिम दिशेला उंच भागावर बाजार भरविला जावा अशा सूचना तहसीलदार कोताडे यांनी केल्या. त्यानुसार मुख्याधिकारी केदार यांच्या मार्गदर्शखाली तुफान आलंया मित्र मंडळाच्या सहाय्याने तसेच नगरपरिषद अतिक्रमण विभाग, स्वच्छता कर्मचारी यांनी शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांच्या उपस्थितीत मैदानावर 10 बाय 12 आकाराच्या जागांची आखणी केली.
दोन व्यावसायिकांमध्ये 3 मीटरचे तर दोन लाईनमध्ये 20 फुटांचे अंतर सोडून आखणी करण्यात आली आहे. सर्व व्यापारी वर्गाने आखून दिलेल्या जातेतच आपला व्यवसाय करणे बंधनकारक असेल, नियमांचे पालन न केल्यास पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार कोताडे यांनी दिला.
मंडळाचे प्रमुख सदस्य दत्ता बोर्हाडे, डॉ. महावीर खिंवसरा, गौराव आंबेकर, नरेश भाटजिरे, शिरीष ठाणेकर, श्याम गवळी आदींसह नगरपरिषदेचे सागर वराडे, राहुल बेंडकुळे, सिध्देश पाटील, भूषण घोरपडे, नागेश पवार, सतीश सोनकुसरे, तुकाराम सोनकुसरे, लक्ष्मण ताटे यांनी आखणीचे कार्य केले.