शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

दलबदलू पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीबाबत धाकधूक

By admin | Published: October 14, 2016 12:33 AM

पक्षनेतृत्वाची कसोटी : काही नगरसेवकांना मिळणार डच्चू

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहत असले तरी प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वीच दुसरा घरोबा करणाऱ्या काही नगरसेवकांमध्ये उमेदवारीबाबत धाकधूक वाढली आहे. आता प्रभागरचना व आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांकडून दावेदारी केली जात असल्याने पक्षनेतृत्वाची विशेषत: सेना-भाजपाची कसोटी लागणार आहे. काही नगरसेवकांना उमेदवारी वाटपात बेदखल केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ-दहा महिन्यांपासून पक्षांतरे सुरू आहेत. त्यात महापालिकेतील सत्ताधारी मनसेला सर्वाधिक फटका बसला असून, मनसेच्या १४ विद्यमान नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि माकपाच्या नगरसेवकांचा समावेश आहे. प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वीच संबंधित नगरसेवकांनी दुसरा घरोबा केला. त्यात काहींनी भाजपात तर काहींनी सेनेत प्रवेश केला आहे. पुन्हा उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने ही पक्षांतरे झाली असली तरी आता प्रत्यक्षात प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सेना-भाजपातील इच्छुकांनी आपली दावेदारी सुरू केली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच पक्षात आलेल्या नगरसेवकांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. काही मातब्बर नगरसेवक सोडले तर अनेक नगरसेवकांची अवस्था बिकट मानली जात असून त्यांना पुन्हा उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षामार्फत निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना मेरीटवरच तिकीट दिले जाणार असल्याचे सेना-भाजपातील सूत्रांकडून सांगितले जात असून संबंधित नगरसेवकांना पुन्हा उमेदवारीचा शब्द दिला नसल्याचीही चर्चा केली जात आहे. त्यामुळे दलबदलू नगरसेवकांच्या नाडीचे ठोके वाढले असून त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)