श्री स्वामी समर्थांच्या मुर्तीची घोटीत प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:58 PM2020-12-27T16:58:17+5:302020-12-27T16:59:23+5:30
घोटी : घोटी येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर बांधण्यात आले असून रविवारी (दि.२७) उत्साही व भक्तिमय वातावरणात तसेच विधिवत मंत्रोच्चारात श्री ची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा पार पडला. पुरोहितांचा मंत्रोच्चार अन् स्वामी समर्थांचा जयजयकार यामुळे परिसर गजबजून गेला होता.

श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या पुढाकारातून घोटीत निसर्गरम्य असलेल्या पाण्याची टाकी परिसरात श्री स्वामी समर्थांचे मंदिर उभारण्यात आले आहे. दत्तजयंती सोहळ्याच्या पूर्वस्थितीत स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
गत दोन दिवसांपासून नवग्रह हवन, तत्वण्यास, कलण्यास हवन होम, बलीपूजन, पूर्णाहुती, महानैवेद्य, गोपूजन आदी सोहळा सुरू होता. रविवारी सकाळपासून कलशपूजन, ध्वजारोहण, श्री स्वामी समर्थ महाराज मूळ पादुका पूजन व स्वामींची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी संदीप कीर्वे, चंद्रकांत वालझाडे, देविदास शिंदे, प्रकाश केदार, संजय काळे, संदीप दिवटे, देविदास वाघचौरे, लक्ष्मण मोरे, ज्ञानेश्वर शिंदे या यजमान दाम्पत्यांच्या हस्ते सर्व पूजा विधिवत करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अखेरीस अभिषेक पूजन, तारकमंत्र,, महाआरती घेऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यासाठी सावळीराम महाराज शिंगोळे, नामदेव महाराज गुरव आदींनी भेट दिली. (२७ घोटी २)