महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:44 PM2021-03-13T23:44:24+5:302021-03-14T00:07:04+5:30

पंचवटी : वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज देयकाची थकीत रक्कम वसुली करण्यासाठी गेले असता, त्यांना पंचवटीत एका ग्राहकाने शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली.

Insulting MSEDCL employees | महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

Next
ठळक मुद्देपंचवटी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सुनील खंडेराव पाटील यांनी तक्रार दाखल केली

पंचवटी : वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज देयकाची थकीत रक्कम वसुली करण्यासाठी गेले असता, त्यांना पंचवटीत एका ग्राहकाने शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली.

याबाबत पंचवटी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सुनील खंडेराव पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाटील व त्यांच्यासमवेत असलेले कर्मचारी नरेंद्र गायकवाड असे दोघे जण साईनगर प्रीतम सोसायटी येथे राहणाऱ्या महेश मुरलीधर झाल्टे यांच्याकडे गेले असता, झाल्टे यांनी शिवीगाळ करून तुम्ही काम कसे करतात, तुमच्याकडे बघतो, असे म्हणून दम दिला. या घटनेनंतर पाटील यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली, त्यावरून हा दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Insulting MSEDCL employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.