बाधित, कोरोनामुक्त दोन आकड्यांत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 01:31 AM2021-10-02T01:31:41+5:302021-10-02T01:32:27+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १) नव्याने बाधित रुग्णसंख्या ९९ तर कोरोनामुक्तची संख्या ९३ होती. दरम्यान, जिल्ह्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,६३६ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १) नव्याने बाधित रुग्णसंख्या ९९ तर कोरोनामुक्तची संख्या ९३ होती. दरम्यान, जिल्ह्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,६३६ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित तसेच कोरोनामुक्त अशी दोन्हींची संख्या खूप दिवसांनी शंभराच्या आत आली आहे. दरम्यान, बाधितांमध्ये नाशिक ग्रामीणचे ६४ तर शहरात ३२ आणि जिल्हाबाह्य ३ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोना उपचारार्थींचे प्रमाण हजाराच्या खाली म्हणजेच ९४३ इतके असले तरी प्रलंबित अहवालांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या प्रलंबित अहवालांचा आकडा हा १८७० वर पाेहोचला असून त्यात तब्बल १४२२ नाशिक ग्रामीणचे, २८७ नाशिक शहराचे तर १६१ मालेगाव मनपाचे अहवाल प्रलंबित आहेत.