१० जुलै १० ऑगस्ट
भगर
साबुदाणा
शेंगदाणा
नायलॉन साबुदाणा
चौकट-
दर का वाढले?
गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर या काळात याच पदार्थांना अधिक मागणी असल्याने बाजारात उपवासाच्या सर्वच पदार्थांचे दर वाढले असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले
चौकट-
साबुदाणा आरोग्याला हानिकारक
उपवास, दैवी शक्तीच्या जवळ जाणे, पचनेंद्रियांना विश्रांती देणे म्हणजे उपवास, लंघन होय. मात्र, आजच्या काळात अनेकांना याचा विसर पडला असून, ‘एकादशी दुप्पट खाशी’ या उक्तीप्रमाणे पचनास जड, अधिक कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करत असतात. साबुदाण्यात कॅलरीजबरोबरच पिस्टमय पदार्थही भरपूर असल्याने ते पचनास जड आहे. यामुळे अपचनाचे विकार होण्याबरोबरच वजनही वाढते, असे आहारतज्ज्ञ मीनल बाकरे-शिंपी यांनी सांगितले.
चौकट-
उपवास आहे, मग हे पदार्थ खा !
पचनेंद्रियांना विश्रांती म्हणून उपवास केला जातो. यासाठी या काळात पचनास हलके असे पदार्थ खायला हवेत. भगर, राजगिरा, फळ, ड्रायफ्रूट, दूध, ताक, नारळ पाणी आदी पौष्टिक आणि नैसर्गिक पदार्थ पचनास हलके असतात. यामुळे उपवासाच्या दिवशी या फळांचे सेवन केले तर ते फायदेशीर ठरते, असे शिंपी यांनी सांगितले.