प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे : भारती पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 12:57 AM2022-05-21T00:57:35+5:302022-05-21T00:58:26+5:30
प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवणं चुकीच आहे. आपली जबाबदारी ओळखून जनतेची सेवा करा. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिला.
येवला : प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवणं चुकीच आहे. आपली जबाबदारी ओळखून जनतेची सेवा करा. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित आढावा बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. येवला मतदार संघाच्या मूलभूत सुविधा, वीज पाणी, रस्ते, आरोग्य आदी प्रश्नांवर आढावा बैठकीत चर्चा झाली. बैठकीत उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
बैठकीस प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पुरवठा अधिकारी बाळासाहेब हावळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी वर्गासह भाजपाचे आनंद शिंदे, समीर समदारिया, डॉ. नंदकिशोर शिंदे, तरंग गुजराथी, राजूसिंग परदेशी, संतोष केंद्रे, नानासाहेब लहरे, धनंजय कुलकर्णी, मनोज दिवटे, संतोष काटे, चेतन धसे, मयूर मेघराज आदींसह तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
इन्फो
...तर मास्क जरूर वापरावा...
मास्कबाबत केंद्राने गाईडलाईन दिल्या असून महाराष्ट्रात जर रुग्णसंख्या वाढत असेल तर मास्क जरूर वापरला पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.