दिंडोरी : शिक्षक हा राष्ट्राचा आधार आहे, संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी हे शिक्षक पार पाडत असतात. ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. ती कायम ठेवावी, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षकसंघाचे त्रैवार्षिक अधिवेशन दिंडोरी येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी तालुका शिक्षकरत्न पुरस्कार वितरण, उत्कृष्ट तंत्रस्नेही पुरस्कार व आदर्श शाळा पुरस्कार वितरित करण्यात आले तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तांबे बोलत होते.व्यासपीठावर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, पंचायत समितीच्या सभापती कामिनी चारोस्कर, उपसभापती विनता अपसुंदे, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, माजी उपसभापती वसंत थेटे, पांडुरंग गणोरे, मनोज ढिकले, राजाराम खैरनार, अर्जुन ताकाटे, बाजीराव सोनवणे, प्रदीप शिंदे, रवींद्र थोरात, मिलिंद गांगुर्डे, दीपक सोनवणे, राजेंद्र गांगुर्डे तसेच सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रकाश चव्हाण, अनुराधा तारगे, दत्तात्रय चौगुले, विलास जमदाडे, मनीषा गायकवाड यांच्यासह तालुक्यातील ५२ शिक्षक-शिक्षिकांना विशेष शैक्षणिक कार्याबाबत ‘शिक्षक रत्न’ पुरस्कार, उत्कृष्ट तंत्रस्नेही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच तालुक्यातील वलखेड, उमराळे बु., इंदोरे, आंबाड, चिकाडी, खोरीपाडा, चिंचखेड, संगमनेर, ब्रम्ह्याचा पाडा या जिल्हा परिषद शाळांना आदर्श व उपक्र मशील शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तालुकाध्यक्ष धनंजय आहेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन श्रावण भोये यांनी केले. प्रास्ताविक सचिन वडजे यांनी केले. शिक्षकसंघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी शिक्षकांचे प्रश्न मांडले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी धनंजय आहेर, सचिन वडजे, नंदकुमार गांगुर्डे, दत्तात्रय चौगुले, योगेश बच्छाव, श्रावण भोये, बाळासाहेब बर्डे, नियाज शेख, प्रवीण वराडे, शंकर ठाकरे, किरण शिंदे, धनंजय वानले, मधुकर आहेर, एन. जे. आहेर, विलास जमदाडे, प्रदीप मोरे, बबिता पाटील, शांताराम आजगे, कैलास पाटोळे, दगडू खैरनार, प्रकाश पाटील, गोपाळ पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्धआमदार डॉ. सुधीर तांबे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिक्षक हा राष्ट्राचा आधार आहे, संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी हे शिक्षक पार पाडत असतात.शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून, जुनी पेन्शन योजना लागू करणे, मुख्यालयाचा प्रश्न सोडविणे, शालेय पोषण आहार योजना सेंट्रल किचनपद्धतीने राबविणे, शिक्षकांचे जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावरचे प्रलंबित प्रश्न सोडविणे यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.
संस्कारक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 11:18 PM
शिक्षक हा राष्ट्राचा आधार आहे, संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी हे शिक्षक पार पाडत असतात. ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. ती कायम ठेवावी, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षकसंघाचे त्रैवार्षिक अधिवेशन दिंडोरी येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी तालुका शिक्षकरत्न पुरस्कार वितरण, उत्कृष्ट तंत्रस्नेही पुरस्कार व आदर्श शाळा पुरस्कार वितरित करण्यात आले तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तांबे बोलत होते.
ठळक मुद्देसुधीर तांबे : शिक्षकसंघाच्या दिंडोरी तालुका अधिवेशनात विविध पुरस्कारांचे वितरण