पुण्याच्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा भास्करबुवा बखले पुरस्कार नाशिकचे ज्येष्ठ संगीतकार जगदेव वैरागकर यांना विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ आणि राज्याचे माजी सांस्कृतिक संचालक विश्वास मेहेंदळे तसेच उद्योजक शैलेश शहा उपस्थित होते.नाशिकच्याच चिन्मय मोघे यांनी लिहिलेल्या संगीत चंद्रप्रिया या नाटकाला उत्कृष्ट संगीत दिल्याबद्दल जगदेव वैरागकर यांना भास्करबुवा बखले पुरस्कार देण्यात आला. रोख रुपये दहा हजार रुपयेआणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारवितरणानंतर बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने बालगंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्वरगंध या नाट्यगीताच्या बहारदार मैफलीत वैरागकर यांनी त्यांच्याच संगीत चंद्रप्रिया नाटकातील ‘बहुमंगल दिन हा नेत्रे पाहियला’ हे नाट्यगीत सादर करून पुणेकर रसिकांची दाद मिळविली. कार्यक्र मास बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, नाट्यगीत गायिका बकूळ पंडित, निर्मला गोगटे, डॉ. विकास कशाळकर आदी उपस्थित होते.
जगदेव वैरागकर यांना ’बखले पुरस्कार’ प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:17 PM