जायखेड्याच्या लाचखोर पोलीस अधिकाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 02:36 AM2022-03-27T02:36:28+5:302022-03-27T02:36:52+5:30
तक्रारदाराच्या आई व बहिणीची नावे दाखल गुन्ह्यातून वगळण्यासाठी ४० हजार ६०० रुपयांची लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना जायखेडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ लाला महाजन (५७) यांना नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.
सटाणा : तक्रारदाराच्या आई व बहिणीची नावे दाखल गुन्ह्यातून वगळण्यासाठी ४० हजार ६०० रुपयांची लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना जायखेडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ लाला महाजन (५७) यांना नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार व त्यांचे आई, वडील व दोन्ही बहिणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील तक्रारदार यांची आई व दोन्ही बहिणी यांची नावे गुन्ह्यातून वगळण्यासाठी नामपूर दूरक्षेत्रातील जायखेडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ लाला महाजन यांनी ४० हजार ६०० रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. नंदुरबारच्या पथकाने कारवाई केली.