मालेगावी अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 04:54 PM2019-02-12T16:54:17+5:302019-02-12T16:55:20+5:30
मालेगाव : अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतन अदा करावे, नवीन नोकरभरती तात्काळ सुरू करावी, अंगणवाड्यांचे समायोजन बंद करावे या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेने मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले होते. शहर पोलीसांनी अंगणवाडी सेविकांना काहीकाळ ताब्यात घेऊन सुटका केली.
महागाई कमी करावी, खाते अंतर्गत पदोन्नती सुरू करावी, अर्थसंकल्पात मानधन वाढीची तरतुद केली आहे त्याची अंमलबजावणी करावी, अंगणवाडींचे समायोजन बंद करावे आदिंसह इतर मागण्यांप्रश्नी अंगणवाडी कर्मचारी सभा युनियनच्या अध्यक्षा शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला होता. मोर्चाला किदवाई रोडवरील जनता दलाच्या कार्यालयापासून प्रारंभ झाला. मोर्चा किदवाई रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे शहर पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आला. यावेळी आंदोलक महिलांनी जेलभरो आंदोलन केले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी आंदोलकांच्या मागण्या व भावना जाणून घेतल्या. यावेळी आंदोलक महिलांना काही काळ ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. या आंदोलनात सईदा अब्दुल्ला, बतुलअजीर्जुरहेमान, नसरीन खान अब्दुल रहेमान, साजदा उस्मानगणी, साजदा मंजुर अय्युबी, शहनाज इकबाल, मुक्ताबाई अहिरे, मुमताज अब्दुल सलाम, बीबी फातेमा मोहंमद सईद, नईमा मोहंमद इस्माईल, सईदा अब्दुल खान, फरहान अब्दुल रहिम, फरीदा अब्दुल्ला, जमीलाबानो कलीम अहमद, खैरुन्निसा शेख फारुक आदिंसह अंगणवाडी सेविका, कर्मचारी सहभागी झाले होते.