नाशिकरोड : जेलरोड जुना सायखेडारोड लोखंडे मळ्यात श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव उत्साहात पार पडला.जेलरोड लोखंडे मळा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करून मांडव टाकण्यात आला होता. यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी सायंकाळी देवीच्या गाण्याचा कार्यक्रम पार पडला. यात्रेनिमित्त बुधवारी सकाळी मांडव डहाळे, रक्तदान शिबिर पार पडले. सत्यनारायण पूजा व होमहवन करण्यात आले. सकाळपासून भाविक व महिलांनी नैवेद्य दाखविण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी परिसरातून श्री म्हसोबा महाराजांच्या प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रेनिमित्त परिसरात विविध वस्तू, खेळणी आदिंची दुकाने थाटण्यात आली होती. यावेळी सोपान लोखंडे, प्रदीप पाटील, सुनील डावरे, अमोल पाटील, विकास आहिरे, तुषार पगार, बाळा वाघमारे, दशरथ लोखंडे, सुरज लोखंडे, अवि चिखले, बाळा साळुंके, प्रमिल परदेशी अजिंक्य बोराडे, गोपाळ नायर आदिंसह भाविक उपस्थित होते.
जेलरोडला म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:47 AM