मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन सोशल ग्रुप आंतरराष्टÑीय फेडरेशनच्या महाराष्टÑ विभागातर्फे संगिनी फोरमचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे होते. अध्यक्षस्थानी फेडरेशनचे आंतरराष्टÑीय अध्यक्ष विरेन शहा होते. फेडरेशन संचालक लालचंद जैन, विभागीय अध्यक्ष प्रविण चोपडा प्रमुख पाहुणे होते. राज्यमंत्री भुसे यांनी जैन सोशल ग्रुप, जैन महिला संगिनी फोरमच्या कार्याचे कौतुक केले. जैन संगिनी फोरम महाराष्टÑ विभागाच्या अध्यक्षा पंकज वडेरा यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार राजस्थानी पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. सभागृहात दोन्ही सत्रात टेलेंट शो, वादविवाद स्पर्धा, नृत्य, मेहंदी आदि स्पर्धा घेण्यात आल्या. जैन सोशल ग्रुप व संगिनी फोरमच्या पंकज वडेरा यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना ‘रत्नप्रभा’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. त्यांनी विद्यार्थी शिक्षण, कर्करोग पीडित रूग्णांसाठी अनेकांनी आर्थिक मदत जाहीर केली.कार्यक्रमात फेडरेशनचे उपाध्यक्ष मांगीलाल कोठारी, विजय कोठारी, गौतम चोरडिया, राजेश दोशी, राजेंद्र धोका, गौतम मेहता, सचिन शहा, जैन संगिनीच्या ममता कासलीवाल, पिंकी मेहता, स्मिता साकला, संगीता साखला, रेखा पहाडे, प्रिती कुचेरिया, युवा फोरमचे नीरव शहा, जैन सोशल ग्रुपचे दिपक शहा, बिपीन पहाडेसह फेडरेशनचे सदस्य, जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगिनी फोरमच्या अधिवेशनाचे सूत्रसंचालन ममता कासलीवाल, मिनल शहा, सारीका पटणी, रेखा पहाडे आदिंनी केले.
जैन संगिनी फोरम राज्यअधिवेशनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 7:43 PM