सिन्नर तालुक्यात जलकुंभ, हातपंप शुध्दीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:56 PM2020-06-25T16:56:15+5:302020-06-25T16:57:48+5:30
सिन्नर:कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात साथ रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या स्वच्छ भारत अभियान कक्षाच्यावतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा, खासगी व आश्रमशाळांचे पाण्याच्या टाक्या तसेच गावोगावच्या हातपंपांचे शुध्दीकरण करण्यात आले.

या अंतर्गत तालुक्यातील 114 ग्र्रामपंचायतींमधील 183 पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, ग्रामपंचायत कर्मचार्यांमार्फत स्वच्छ करण्यात आले. त्याचप्रमाणे शाळा, अंगणवाड्यांच्या 182 टाक्याही निवळीचे द्रावण टाकून स्वच्छ करण्यात आल्या.
संपूर्ण जगातत सद्या कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाण्यापासून होणार्या साथ रोगांना आळा घालण्यासाठी स्वच्छ भारत अभियान कक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून जलकुंभ स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. नागरिकांना शुध्द व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे, जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता व संनियंत्रण व सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. तालुक्यात 1 जून पासून टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. टाक्या स्वच्छ झाल्यानंतर या टाक्या पुन्हा भरुन नळावाटे पाणी सोडण्यात आले. हे पाणी भरण्यासही नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर पुर्णतः जलकुंभ स्वच्छ झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. हातपंप शुध्दीकरण करताना पंपाचे झाकण खोलून 6 इंचसाठी 300 ग्र्रॅम तर 4 इंचसाठी 150 ग्रॅम ब्लिचींग पावडरचे द्र्रावण टाकून शुध्दीकरण करण्यात आले. टाक्या आणि हातपंप शुध्दीकरणानंतर काही काळ त्यातील पाणी पिण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला होता. तालुक्यातील सर्व जलकुंभ आता स्वच्छ करण्यात आल्याने पावसाळ्यात पाण्यापासून होणार्या जलजन्य आजारांना आळा बसणार आहे.