नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, दिवसाला अडीच ते तीन हजार नवे बाधित आढळत आहेत, तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे देशपातळीवर सर्वाधिक काेरोना संसर्ग हेाणाऱ्या शहरात नाशिकचे नावही घेतले गेले आहे. राज्य सरकारने ५ एप्रिलपासून राज्यात निर्बंध घातले असून, १५ एप्रिलपासून अंमलबजावणी अधिक कठोर केली आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र मुख्य बाजारपेठा बंद असल्या, तरी उपनगरात मात्र दुकाने सुरूच असल्याचे दिसत आहे, तसेच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडता येईल, असे जाहीर करूनही नागरिकांची वर्दळ कमी होत नाही.
कोराेनाबाधितांची वाढती संख्या, तसेच बाधितांना रुग्णालयाचे बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शनही मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करावे आणि किमान दहा दिवस जनता संचारबंदी पाळावी, असे आवाहन उद्योग- व्यावसायिकांनी नाशिकच्या विकासासाठी स्थापन केलेल्या नाशिक सिटिझन फेारमने केले होते. त्याला अन्य संघटनांनीही पाठिंबा दिला असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यावर नागरिकांचा वावर कायम राहिल्याचे सेामवारी (दि. १९) दिसले.
इन्फो...
धान्य किराणा व्यावसायिकांनी आपले व्यवसाय जीवनावश्यक असले, तरी दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, मध्यवर्ती भागात त्याची चांगली अंमलबजावणी झाल्याचे दिसले. मात्र, अन्यत्र उपनगरात रात्रीपर्यंत दुकाने सुरूच होती.