जानोरी-मोहाडी-नाशिक मनपाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:40+5:302021-09-03T04:15:40+5:30

जानोरी : जानोरी-मोहाडी-नाशिक विमानतळ, गावासाठी नाशिक महानगरपालिकेची बस सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच बसचालक व वाहक ...

Janori-Mohadi-Nashik Municipal Corporation | जानोरी-मोहाडी-नाशिक मनपाची

जानोरी-मोहाडी-नाशिक मनपाची

googlenewsNext

जानोरी : जानोरी-मोहाडी-नाशिक विमानतळ, गावासाठी नाशिक महानगरपालिकेची बस सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच बसचालक व वाहक यांचा श्रीफळ व शाल देऊन ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.

अनेक दिवसांपासून कोरोनामुळे नाशिक शहर बससेवा बंद पडल्याने नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने भाजपाच्यावतीने योगेश तिडके यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना जानोरी मोहाडी नाशिक विमानतळ ही बससेवा सुरू करावी असे निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती.

महापौर कुलकर्णी यांनी निवेदनाची दखल घेऊन दररोज एक तासाच्या अंतरावर नाशिक महानगरपालिकेची बस सेवा सुरू केल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच नाशिक महानगरपालिका बससेवा सुरू करण्यासाठी खासदार भारती पवार, गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर काठे यांच्या मार्गदर्शनाने व विष्णुपंत काठे, शंकर वाघ, गणेश तिडके, योगेश तिडके, ज्ञानेश्वर डवणे, सुनील तिडके यांच्या प्रयत्नाने जानोरी, मोहाडी, नाशिक विमानतळासाठी बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

कोट...

जानोरी मोहाडी तसेच विमानतळासाठी शहर बससेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. कारण या भागात विमानतळ असल्याने प्रवाशांची बरीच ये-जा असते. तसेच विद्यार्थ्यांचे व शिक्षक आदींचे खूप हाल होत होते. ही बससेवा सुरू करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.

विष्णुपंत काठे

माजी उपसरपंच, जानोरी. (०२ जानोरी)

020921\02nsk_42_02092021_13.jpg

चालक अन‌् वाहक यांचा जारोरी ग्रामस्थांकडून झाला सत्कार

Web Title: Janori-Mohadi-Nashik Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.