इस्कॉन मंदिरात झुलन यात्रेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:06 AM2019-08-12T01:06:34+5:302019-08-12T01:06:58+5:30
श्रावण महिन्यात वृंदावनमध्ये साजऱ्या होणाºया उत्सवांपैकी एक म्हणजे झुलन यात्रा. भगवान श्रीकृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी प्रगट झाले त्याचे औचित्य साधत वृंदावनमध्ये १३ दिवस झुलन यात्रोत्सव साजरा होतो.
नाशिक : श्रावण महिन्यात वृंदावनमध्ये साजऱ्या होणाºया उत्सवांपैकी एक म्हणजे झुलन यात्रा. भगवान श्रीकृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी प्रगट झाले त्याचे औचित्य साधत वृंदावनमध्ये १३ दिवस झुलन यात्रोत्सव साजरा होतो. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील इस्कॉन मंदिरातही पाच दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला असून, १५ तारखेपर्यंत सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत सोहळा सुरू राहणार आहे.
येथील इस्कॉन मंदिरात झुलन यात्रेत भगवान श्रीकृष्ण यांची उत्सवमूर्ती (मूळ विग्रह) वेदीवरून फुलांनी सजविलेल्या झोक्यावर स्थापन केली जाते. आरतीनंतर उपस्थित भाविकांकडून भगवंताला झोका दिला जातो. जय राधे, जय कृष्ण, जय वृंदावन असा जयघोष करून कीर्तन करण्यात आले.