उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे २१ तबलावादकांची जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:45 AM2018-02-09T01:45:56+5:302018-02-09T01:46:22+5:30

नाशिक : उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे बुधवारी (दि. ७) श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त २१ तबलावादकांच्या जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम भाविकांनी अनुभवला.

Junking 21 Tablaists by Gajanan Maharaj Seva Parivar in Kalikanagar area of ​​Utah | उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे २१ तबलावादकांची जुगलबंदी

उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे २१ तबलावादकांची जुगलबंदी

googlenewsNext
ठळक मुद्देगजानन महाराजांची सायंकाळची आरती कार्यक्रमास ‘अंतर्नाद’ असे नाव

नाशिक : उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे बुधवारी (दि. ७) श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त २१ तबलावादकांच्या जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम भाविकांनी अनुभवला. नाशिक शहरात पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उंटवाडी परिसरात झालेल्या या कार्यक्रमात विविध वयोगटांतील २१ तबलावादकांनी त्रितालातील कायदे, तुकडे, ताल दादरा हे राग तबल्यावर सादर केले. गुरुवंदना परण व गणपतीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. रत्नाकर संत गुरुजींनी गजानन महाराजांची सायंकाळची आरती केल्यानंतर तिलाही तबल्यावर साथ दिली. शहरातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गजानन महाराज सेवा परिवार दरवर्षी अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आले आहे. दिगंबर सोनवणे, रसिक कुलकर्णी यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमास ‘अंतर्नाद’ असे नाव देण्यात आले होते. सुरेल अशा सादरीकरणाला भाविकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. दरम्यान, प्रगट दिनानिमित्त सकाळपासून भाग्योदय अपार्टमेंट, कालिका पार्कजवळ सकाळी १० वाजता भालचंद्र संत यांच्या हस्ते श्रींची महापूजा, दुपारी महाआरती, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ‘भक्तिसंध्या’ हा भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम राघवेंद्र अंकलगी, सावणी कुलकर्णी व नितीन जोशी यांनी सादर केला. तत्पूर्वी श्रीरंगावधून भजनी मंडळाच्या सदस्यांनी विविध भजने सादर केली. सायंकाळी ७.३० वाजता भावांजली हा भक्तिगीतांचा कार्यक्रम स्वरसाज विनोद कुलकर्णी, प्रसाद गोखले व सहकलाकारांनी सादर केला. रात्री ९.३० वाजता शेजारतीने कार्यक्रमाची सांगता झाली. धनंजय संत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास परिसरातील भाविक उपस्थित होते.

Web Title: Junking 21 Tablaists by Gajanan Maharaj Seva Parivar in Kalikanagar area of ​​Utah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.