येथील सरपंचपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे येथील सरपंचपदाची औपचारिकता बाकी होती. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ब्रम्हानंद शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष पांडूशेठ केदार यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने १३ पैकी ११ जागा जिंकत बहुमत प्राप्त केले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी महेश वेठेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी एन. बी. हासे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली. सरपंचपदासाठी ज्योती भालेराव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून जयश्री कैलास जाधव यांची स्वाक्षरी होती. उपसरपंचपदासाठी जगन्नाथ केदार व ज्ञानेश्वर आव्हाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. केदार यांच्या अर्जावर सूचक दत्तू दराडे यांची स्वाक्षरी होती. अर्ज माघार घेण्याच्या वेळेत आव्हाड यांनी अर्ज माघार घेतल्याने केदार यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे सरपंचपदी ज्योती भालेराव तर उपसरपंचपदी जगन्नाथ केदार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
बैठकीस बाळू हरी सांगळे, साहेबराव जाधव, दत्तू दराडे, ज्ञानेश्वर आव्हाड, सुखदेव आव्हाड, कमल माळी, सविता आव्हाड, जयश्री जाधव, वैशाली केदार, राजश्री शेळके, अंकिता वाघ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - २५ दोडी सरपंच
सिन्नर तालुक्यातील दोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती भालेराव तर उपसरपंचपदी जगन्नाथ केदार यांची बिनविरोध झाली. त्याप्रसंगी जल्लोष करताना समर्थक.
===Photopath===
250221\25nsk_29_25022021_13.jpg
===Caption===
फोटो - २५ दोडी सरपंच सिन्नर तालुक्यातील दोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती भालेराव तर उपसरपंचपदी जगन्नाथ केदार यांची बिनविरोध झाली. त्याप्रसंगी जल्लोष करताना समर्थक.