नाशिकच्या काळाराम मंदिर विश्वस्तपदाचा वाद न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 08:12 PM2020-01-15T20:12:14+5:302020-01-15T20:12:35+5:30
काळाराम विश्वस्त मंडळ सहा वर्षांसाठी असते. त्यात विश्वस्त मंडळाच्या एकूण दहा जागा असून त्यात घटनेनुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. विश्वस्तांच्या दहा जागांपैकी तीन जागा ह्या पुजारी घराण्यातील,
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दहा विश्वस्तांच्या जागांपैकी अध्यक्षांनी निवडलेल्या तीन जागांवर एका माजी विश्वस्ताने हरकत घेत उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने तिघा विश्वस्तांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
काळाराम विश्वस्त मंडळ सहा वर्षांसाठी असते. त्यात विश्वस्त मंडळाच्या एकूण दहा जागा असून त्यात घटनेनुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. विश्वस्तांच्या दहा जागांपैकी तीन जागा ह्या पुजारी घराण्यातील, तर तीन विश्वस्त जुन्या विश्वस्तातून निवडण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत व उर्वरित चार जागा धर्मादाय आयुक्तांकडून निवडल्या जातात. अध्यक्षांनी जुन्या विश्वस्त मंडळातील मंदार जानोरकर, वैद्य एकनाथ कुलकर्णी, दत्तप्रसाद निकम यांची अलिकडेच नियुक्ती केली आहे.
२०१९ ते २५ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी व घटनेत नमूद असलेल्या जुन्या सदस्यातून ३ सदस्य निवडतांना १४ आॅक्टो २०१९ रोजी बैठकीचा अजेंडा काढला आहे. त्यात बैठकीचे ठिकाण जिल्हा न्यायालयातील त्यांच्या स्वत:च्या निजी कक्षात दर्शविले आहे. मुळात संस्थेची बैठक अशा न्यायालय आवारात निजी कक्षात घेता येत नाही. दत्तप्रसाद निकम हे संस्थेचे संचालक असतांना त्यांनी संस्थेच्या कार्यक्रमात पत्नीच्या नावे गायनापोटी ११ हजार रुपये मानधन मिळवून दिले आहे. संस्थेच्या संचालकांनी स्वत:च्या किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्तीसाठी संस्थेच्या पैशाचा वापर करणे हे मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्याने गुन्हा असल्याची हरकत माजी विश्वस्त पांडुरंग बोडके यांनी घेत न्यायालयात दावा दाखल केला आहे.
दरम्यान, धमार्दाय आयुक्तांकडून नियुक्त केल्या जाणाºया चार जागांसाठी तब्बल ७२ इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यातून सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त शांताराम अवसरे, अॅड. दिलीप कैचे, शुभम मंत्री, आणि डॉ. मिलिंद तारे या चौघांची निवड करण्यात आली. तर पुजारी घरण्यातून धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.