कळवण : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अभोणा पंचायत समिती गणाचे सदस्य जगन साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिलवाडी या आदीवासी गावाला सभापतीपदाची संधी प्रथमच मिळाली आहे.कळवण पंचायत समितीचे सभापती केदा ठाकरे यांनी आवर्तन पद्धतीने सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने पंचायत समिती सभापतीपदासाठी तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात निवडणुक घेण्यात आली. सभापतीपदासाठी साबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बी एस कापसे यांनी केली. फेब्रुवारी २०१७ मध्ये कळवण पंचायत समितीची निवडणूक होऊन त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून एकहाती सत्ता काबीज केली होती. तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या होत्या. सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने अभोणा गणातील सदस्य साबळे यांना सभापतीपदाची संधी मिळाली.सभापती निवडीप्रसंगी सभागृहात जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते यशवंत गवळी, जिल्हा बॅक संचालक धनंजय पवार, उपसभापती पल्लवी देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, माजी सभापती केदा ठाकरे, लालाजी जाधव, आशाताई पवार, विजय शिरसाठ, मिनाक्षी चौरे,सौ मनीषा पवार, संदीप वाघ, रामा पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरजेचे राजकारणकळवण पंचायत समतिीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ तर काँग्रेसचे २ पंचायत समिती सदस्य असून बहुमत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आहे अशी राजकीय परिस्थिती असतांना जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी आघाडी धर्म पाळून पंचायत समिती सभापतीपदावर काँग्रेसचे जगन साबळे यांची वर्णी लावली.उपसभापतीपदावर सध्या काँग्रेसच्या पल्लवी देवरे विराजमान असून सभापती व उपसभापतीपदावर काँग्रेसला संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने बेरजेचे राजकारण केल्याचे बोलले जात आहे.
कळवण पंचायत समिती सभापतिपदी साबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 1:17 AM
कळवण : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अभोणा पंचायत समिती गणाचे सदस्य जगन साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिलवाडी या आदीवासी गावाला सभापतीपदाची संधी प्रथमच मिळाली आहे.
ठळक मुद्देकळवण : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अभोणा पंचायत समिती गणाचे सदस्य जगन साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिलवाडी या आदीवासी गावाला सभापतीपदाची संधी प्रथमच मिळाली आहे.