पेठ परिसरात खांडणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:40 PM2018-02-17T14:40:07+5:302018-02-17T14:40:31+5:30
पेठ - आगामी खरीप हंगामाच्या तयारीला आदिवासी बळीराजा लागला असून खांडणीपासून आदिवासी शेतकºयांची मशागत सुरू होत असते.
पेठ - आगामी खरीप हंगामाच्या तयारीला आदिवासी बळीराजा लागला असून खांडणीपासून आदिवासी शेतकºयांची मशागत सुरू होत असते. पेठ सुरगाणा तालुक्यात सर्वाधीक भात व नागलीचे पिके घेतली जात असून या दोन्ही पिकांना पेरणीपूर्व व लावणी अशा दोन प्रकारच्या मशागती केल्या जातात. पावसापूर्वी धुळपेरणी करण्याची पद्धत असून त्याला राब भाजणी असे संबोधले जाते. शेताच्या एका कोपर्यात सर्वप्रथम जामिन भाजली जाते. त्यासाठी शेतकरी आधीच तयारीला लागत असतो. रानातील झाडांची छाटणी करून त्यांचा पालापाचोळा, गोवºया व गवत एकत्र करून भाजणी केली जाते. यासाठी कोणत्याही मोठया झाडाला इजा न होता बारीक फांद्या तोडल्या जातात. वाळलेल्या फांद्या एकत्र करून त्यातून राब भाजणी केली जाते. सद्या शेतकरी खांडणीत मग्न असून उंचच झाडांची छाटणी केल्याने गावाच्या शिवारात झाडांचे आकर्षक सांगाडे उभे असल्याचे दिसून येतात.