नाशिक : धार्मिक पर्यटनासाठी देशभरात प्रसिध्द असलेल्या नाशिक पुण्यनगरीत भाविक मोठ्या संख्येने येतात. त्याचा फायदा घेत औरंगाबाद येथील काही महिला चोर भाविकांच्या खिशांवर डल्ला मारत होते. गोदाकाठावरील कपालेश्वर मंदिरात गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या रांगेत उभे राहून महिलांच्या पर्समधील रोकडसह मौल्यवान वस्तू लंपास करणाºया औरंगाबादच्या महिलांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन दिवसांपूर्वीच कपालेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी आलेल्या एका युवतीच्या पर्सची चैन तिच्या पाठीमागे उभे राहून उघडून त्यातून बाराशे रुपये रोकडसह एटीएम कार्ड तसेच अन्य वस्तू चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमे-याने टिपली. तीन युवती भाविकांच्या रांगेत येऊन उभ्या राहतात. दर्शनासाठी उभे असल्याचा बनाव करत ज्या महिलेचे पर्समधून वस्तू काढायच्या आहेत, त्याभोवती उभ्या राहतात आणि एक युवती अलगद पर्समधून रोकड लंपास करताना दिसते. यावेळी एक युवती संबंधित महिलेशी संवादही साधण्याचा प्रयत्न करते. तीघा महिला चौरांपैकी एकीच्या कडेवर लहान बाळही असल्याचे फुटेजमध्ये दिसते.चोरीच्या घटनेनंतर युवतीने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. त्यानंतर पंचवटी पोलिसांच्या पथकाने श्री कपालेश्वर मंदिर गाठत परिसरात बसविलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता तीन संशयीत महिला चोरी करत असतानाचे आढळून आले. फुटेजमधक्षल वर्णनानुसार काही वेळातच तिघा महिलांना गंगाघाटावरून पोलिसांनी ताब्यात घेतले.संशयित शीतल सदाशिव पवार व लैला काळे असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्यासोबत फुटेजमध्ये दिसणारी युवती अल्पवयीन असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. या महिलांनी यापुर्वीही गर्दीच्या ठिकाणी जाऊन अशाप्रकारे चो-या केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. त्यानुसार पंचवटी पोलिस तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंचवटीतील विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पाकीटमार महिलांचा सुळसुळाट वाढल्याने पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज आहे.
कपालेश्वर मंदिरात भाविकाच्या बॅगेतून रोकड लुटणाऱ्या महिला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 6:09 PM
धार्मिक पर्यटनासाठी देशभरात प्रसिध्द असलेल्या नाशिक पुण्यनगरीत भाविक मोठ्या संख्येने येतात. त्याचा फायदा घेत औरंगाबाद येथील काही महिला चोर भाविकांच्या खिशांवर डल्ला मारत होते.
ठळक मुद्देघटना मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमे-याने टिपली. पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.