यावेळी परिसरातील दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी समजावून घेत, विविध कल्याणकारी शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. दिव्यांग दिन दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी व दिव्यांग बांधवांच्या समस्या मार्गी लागाव्यात या उद्देशाने साजरा केला जातो, असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सुकदेव खुर्दळ यांनी केले. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी केले. यावेळी सरपंच रेखाताई मोरे, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे तालुकाप्रमुख जयंत थेटे, उपतालुका प्रमुख राजेंद्र शिंपी, दहेगावचे सरपंच कविता भोंडवे आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
===Photopath===
031220\03nsk_16_03122020_13.jpg
===Caption===
करंजवण ग्रामपंचायतीत आयोजित दिव्यांग दिन कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती सदस्य मालती खराटे, सरपंच रेखा मोरे, अरुण आहेर, सुकदेव खुर्दळ, जयंत थेटे,कविता भोंडवे आदींसह दिव्यांग बांधव.०३ वरखेडा १