नाशिक : इस्लामी जगतात घडणाºया बदलासह कट्टरवादी विचारधारेतून होणाºया दहशतवादाच्या जन्मामुळे भयावह परिणाम आशियाई देशांना भोगावे लागत आहेत. सौदी अरेबिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांसारख्या देशांनी सुरुवातीला दहशतवादी संघटनांच्या पायाभरणीसाठी रसद पुरविली; मात्र सध्या या संघटनांच्या क्रौर्याला त्यांनाही सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन कर्नाटकच्या आयपीएस-आयडीपीएस सिनिअर फेलो प्रभा राव यांनी केले.मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त तीनदिवसीय व्याख्यानमालेचा शुभारंभ मंगळवारी (दि.१२) करण्यात आला. कुसुमाग्रज स्मारकात पहिले पुष्प राव यांनी ‘इस्लामीक जगतातील बदल व त्याचे भारतावर होणारे परिणाम’ या विषयावर गुंफले. यावेळी राव म्हणाल्या, जगातील सर्व मुस्लिमांना दहशतवादाशी जोडणे योग्य नाही तरीही अधिकाधिक तरु ण हे अशा दहशतवादी मुस्लीम संघटनांकडे आकर्षित होऊन त्यांच्याशी जोडले गेले हे सत्या नाकारता येणारे नाही. यमेन, सीरिया, लिबीया या देशांमध्ये निर्माण झालेला दहशतवाद आणि त्याचे भेडसावणारे दुष्परिणाम हे देश भोगत आहेत. इराण व सौदी अरेबियाच्या मध्ये असलेल्या यमेनची अवस्था बिकट झाली असून, तेथूनच इसिससारखी दहशतवादी संघटना उदयास आली. इराणच्या विरोधात सौदीने तालिबानीसारख्या दहशतवादी संघटनेला आर्थिक बळ दिले; मात्र त्याचे परिणाम आता सौदी अरेबियावरही होताना दिसून येत आहे. अशीच अवस्था पाकिस्तानची झाली आहे. चीननेदेखील पाकिस्तानला आर्थिक मदत करत बळ देण्याचा प्रयत्न केल्याचे राव यांनी यावेळी सांगितले. जसे पूर्वी भारत-रशिया यांचे संबंध होते तसेच संबंध सध्या चीन आणि रशियाचे झाले असून, चीनचे पाकिस्तानला मिळणाºया बळामुळे या सर्व परिस्थितीचा परिणाम भारतावर होऊ शकतो. प्रास्ताविक सहकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांनी केले.
कर्नाटकच्या आयपीएस-आयडीपीएस सिनिअर फेलो प्रभा राव कट्टरवादातून दहशतवादाचा जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:09 AM
इस्लामी जगतात घडणाºया बदलासह कट्टरवादी विचारधारेतून होणाºया दहशतवादाच्या जन्मामुळे भयावह परिणाम आशियाई देशांना भोगावे लागत आहेत.
ठळक मुद्दे तीनदिवसीय व्याख्यानमालेचा शुभारंभ सर्व मुस्लिमांना दहशतवादाशी जोडणे योग्य नाहीपाकिस्तानला बळ देण्याचा प्रयत्न