नाशिक : जुने नाशिक परिसरातील गोदाकाठालगत गावठाण भागात असलेल्या काजीगढीवरील धोकादायक झालेल्या घरांमधील सुमारे ३५ कुटुंबांचे स्थलांतर पोलीस बंदोबस्तात महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. सकाळी दहा वाजेपासून गढीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा व स्थलांतरीत होण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. शहरात रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे गढी ढासाळण्याचा धोकाही वाढला आहे. शनिवारी (दि.६) जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुरज मांढरे यांनी महापालिका व पोलीस प्रशासनाला आपत्ती व्यवस्तापन कायदा २००५नुसार तत्काळ काजी गढीवरील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे लेखी आदेश बजावले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने खडबडून जागे होत गढीचा परिसर गाठला. शनिवारी दिवसभर पालिका प्रशासनाने गढीवरील रहिवाशांना तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरीत करण्यासाठी ‘जोर’ लावला; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पाच ते सात कुटुंबांनी स्थलांतर केले. रहिवाशांनी रविवारी सकाळी स्थलांतर करणार असल्याचे शनिवारी रात्री पोलीस, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. रविवारी पहाटेपासून पावसाला जोरदार सुरू वात झाली. तथापी आपत्ती व्यवस्थापन विभागाचा लवाजमा सकाळी साडेनउ वाजेच्या सुमारास गढीवर दाखल झाला. गढीवरील रहिवाशांनी तत्काळ स्थलांतरीत होण्याची उद्घोषणा करण्यास सुरूवात झाली. पोलीसांचा फौजफाटाही वाढविला गेला. अधिकारी-कर्मचा-यांनी रहिवाशांसोबत समन्वय साधून तत्काळ संसारपयोगी वस्तू व आपल्या कुटुंबीयांसोबत महापालिकेच्या वाहनांमधून तात्पुरत्या निवाराकेंद्रात हलविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. दुपारी दोन वाजेपर्यंत ३० ते ३५ कुटुंबीयांना स्थलांतरीत करण्यात आले. चार वाजता प्रशासनाकडून पुन्हा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले गेले
काझी गढी : दुपारपर्यंत ३५ कुटुंबांचे पोलीस बंदोबस्तात स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 3:22 PM
जुने नाशिक परिसरातील गोदाकाठालगत गावठाण भागात असलेल्या काजीगढीवरील धोकादायक झालेल्या घरांमधील सुमारे ३५ कुटुंबांचे स्थलांतर पोलीस बंदोबस्तात महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.
ठळक मुद्देस्थलांतरीत होण्याची उद्घोषणा करण्यास सुरूवात पोलीसांचा फौजफाटाही वाढविला गेला. पावसाचा जोर वाढल्यामुळे गढी ढासाळण्याचा धोकाही वाढला