गारखेड्याच्या सरपंचपदी खैरनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 04:51 PM2019-12-10T16:51:28+5:302019-12-10T16:52:22+5:30

येवला : गारखेडा येथील थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत संजय खैरनार यांनी केवळ ११ मतांनी विजय मिळविला.

 Khairnar as patron saint of Garkheda | गारखेड्याच्या सरपंचपदी खैरनार

गारखेड्याच्या सरपंचपदी खैरनार

googlenewsNext
ठळक मुद्दे सरपंचपदासाठी संजय खैरनार (२४०), गणेश खैरनार (२२९), गजानन खैरनार (१८५), दगू खैरनार (४३) यांनी निवडणूक लढविली होती. यातून संजय खैरनार हे ११ मते जास्त घेऊन विजयी झाले आहेत.


सर्वसाधारण पदासाठी सरपंचपद राखीव असल्याने येथे जोरदार चुरस होती. सदस्यांच्या तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण महिला जागेवर मीराबाई खैरनार तर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेवर भीमा शंकर खैरनार हे विजयी झाले. प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण महिलेच्या जागेवर इंदूबाई खैरनार तर सर्वसाधारण जागेवर कचरू खैरनार हे विजयी झाले. प्रभाग तीनमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिला जागेवर मोनाली गायकवाड, अनुसूचित जातीच्या जागेवर महेश गायकवाड, तर सर्वसाधारण महिलेच्या जागेवर अलका खैरनार यांनी विजय संपादन केला. यातून सदस्यपदासाठी यापूर्वीच बिनविरोध म्हणून मोनिका गायकवाड , मीराबाई खैरनार, इंदूबाई खैरनार निवडून आल्या होत्या.
 

Web Title:  Khairnar as patron saint of Garkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.