वडनेरभैरव : पोलीस म्हटला की, माणूसघाण्या किंवा निर्दयी असा एक समज समाजात पसरलेला असताना खाकी वर्दीतही सेवाभावी व संवेदनशील माणूस दडलेला असतो याचे प्रत्यंतर देशभर कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याच्या काळात महामार्गावरील उपाशी जीवांची भूक भागविण्याचा उपक्रम राबविणाऱ्या वडनेरभैरव पोलिसांची कामगिरी बघताना आले.कोरोनोच्या प्रादूर्भावाने संपूर्ण भारतासह राज्यात जमावबंदी व लॉकडाउन करण्यात आल्यामुळे महामार्गावर काही वाहने रस्त्याच्या कडेला अडकून पडलेली आहेत. रस्त्यावर खाण्या-पिण्याची साधने उपलब्ध नसल्याने वाहनचालक, क्लिनर यांची उपासमार होत आहे. त्याचबरोबर रस्त्याने ये-जा करणा-या प्रवाशांकडून मिळेल ते खाऊन आपला उदरनिर्वाह भागविणा-या भिकारी तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांचे खाण्याचे वांधे होत आहेत. लॉकडाऊनमुळे या घटकांचा जीवन-मरणाचा प्रश्न गंभीर बनल्याचे वडनेरभैरव पोलिसांना पेट्रोलिंग करताना निदर्शनास आले. या उपाशी जीवांची दोनवेळेच्या जेवणाची गैरसोय दूर व्हावी यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संतोष वाघ, कृष्णा भोये, दत्तू आहेर व कल्याण जाधव यांनी वडनेर भैरव पोलिस स्टेशनच्या हद्दीत व राष्ट्रीय महामार्ग ३ वर जेवण, पाणी व फळांचे वाटप करण्यात आले. पोटभर जेवण मिळाल्यामुळे त्या उपाशी वर्गाकडून पोलिसांना धन्यवाद देण्यात येत आहेत.१३ जणांवर गुन्हे दाखलकोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन असल्याने या घटनेकडे मनोरंजन म्हणून पाहणा-या व इतरांनाही घराबाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करणा-या १३ जणांवर वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत असताना काही जणांना त्याचे गांभीर्य दिसत नाही. आम्ही यापूर्वी वैयक्तिकरित्या क्लिप बनवून सोशल मिडिया मार्फत तसेच गावदवंडी देऊन नागरिकांचे प्रबोधन करीत आहोत. तरीदेखील अकारण घराबाहेर पडणाºया लोकांवर पोलीस पाटीलमार्फत लक्ष ठेवून आहोत. संचारबंदीचे उल्लंघन करणा-या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.- गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक. वडनेरभैरव