खरीपाच्या पिकांनी दिली बळीराजाला साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 03:16 PM2020-08-08T15:16:00+5:302020-08-08T15:16:45+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील खरीप हंगामातील सर्व कामे करून पिके जोमाने वाढू लागले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांनी बळीराजांला चांगली साथ दिली आहे. परंतु पिकांना आता खत टंचाई निर्माण झाल्याने बळीराजा अडचणीत आल्याने त्यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील खरीप हंगामातील सर्व कामे करून पिके जोमाने वाढू लागले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांनी बळीराजांला चांगली साथ दिली आहे. परंतु पिकांना आता खत टंचाई निर्माण झाल्याने बळीराजा अडचणीत आल्याने त्यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील लखमापूर, परमोरी, करंजवण, ओझे, दहेगाव वागळुद, अवनखेड, ओझरखेड, दहिवी आदी परिसरातील सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, भात, नागली, खुरसणी, ज्वारी, बाजरी या खरीप हंगामातील पिकांनी चांगला जोमाने वाढण्यास सुरु वात केली आहे. परंतु पिकांसाठी पोषक असलेले खतांची टंचाई निर्माण झाल्याने बळीराजांच्या नियोजनावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या युरिया टंचाई बळीराजा त्रस्त झाला आहे. बुकिंग करून ही युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेतआहे.
सध्या शेतकरी वर्गासमोर जोमाने आलेल्या खरीप हंगामातील पिकांना जे खाद्य देणे. परंतु ते जर पिकांना वेळेवर नाही भेटले. तर पिके पिवळी पडून पिके नष्ट होतील की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.
मध्यंतरी पावसाने आपला लहरीपणा दाखवत पोबारा केला होता. परंतु आता पिकाला पोषक असा पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहऱ्यावर हसु निर्माण झाले होते. पण आता खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने आता पुढे काय? असा सवाल निर्माण झाला आहे.
मिळेल त्या ठिकाणाहून आगाऊ खताची बुकिंग करून तसेच तारेवरची कसरत करून आपली पिके वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाची त्रेधा तिरपीट उडत आहे. तरी पण आपल्या खरीप हंगामाच्या नियोजनावर पाणी फिरू नये. यासाठी शेतकरीवर्गाने मोर्चा बांधणीला सुरु वात केली आहे.
चौकट......
सध्या शेतकरी वर्गाला भाजीपाल्याने मायेचा हात दिल्याने, शेतकरी वर्गाला थोडेफार खेळते भांडवल उपलब्ध झाल्याने बळीराजांला मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे कठीण संकटात शेतकरी वर्गाला नगदी पिकांनी साथ दिल्याने बळीराजांची नौका थोडी फार का होईना तिराला लागली आहे. त्यामध्ये सध्या कोथिंबीर, कोबी, काकडी,भेंडी व इतर काही ठराविक भाजीपाला यांनी शेतकरी वर्गाला आधार दिला आहे.