नांदूरवैद्य : मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व विभागीय सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.२९) झालेल्या विशेष बैठकीत भावली धरणातुन शहापुरला पाणी देण्यास आमदार हिरामण खोसकर यांनी विरोध दर्शवला.या वर्षी इगतपुरी तालुक्यात पावसाचे प्रमाण घटले असुन उन्हाळ्यात तालुक्यातच पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे तालुक्यातील वैतरणा व भावली धरणाला जलसंपदामंत्री पाटील यांनी शनिवारी (दि. २५) खासदार हेमंत गोडसे व आमदार हिरामण खोसकर यांच्या समवेत थेट भेटी देऊन पाहणी करून स्थानिक प्रकल्पग्रस्तासंवेत चर्चा केली होती.तसेच वैतरणा धरणातील अतिरिक ओव्हरफ्लोचे पाणी मुकणे धरणात टाकण्याविषयीचा प्रस्ताव व नदीजोड प्रकल्पाचे धोरण याबाबत गोडसे, खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ यांनी जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केली होती. या अनुशंगाने सर्व विभागीय सचिव अर्थ व महसूल विभागाची संयुक्त बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.मंत्रालयात १९७९ साली झालेल्या बैठकीत वैतरणा धरणातील अतिरीक्त जमिनी मुळमालकांना परत देण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र हा प्रश्न अद्यापही प्रलंबित राहील्याने या बैठकीत वैतरणा धरणाच्या लाभ क्षेत्राबाहेरील संपादित जमिनी मुळमालक शेतकऱ्यांना परत देण्याचा शासनाचा विचार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.या बैठकीला घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके, तालुका खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, संदीप गुळवे, गोकुळ थेटे शेतकºयांच्या वतीने माजी सरपंच पांडुरंग खातळे, रामदास जमधडे, मिलींद कुकडे, गोविंद जमदडे, नंदु जमदडे आदी उपस्थित होते.(फोटो ०१ नांदुरवैद्य)मंत्रालयाती बैठकीप्रसंगी जयंत पाटील समवेत हेमंत गोडसे, हिरामण खोसकर, गोरख बोडके व शेतकरी आदी.
भावली धरणाचे पाणी शहापुरला देण्यास खोसकर यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 3:04 PM
नांदूरवैद्य : मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व विभागीय सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.२९) झालेल्या विशेष बैठकीत भावली धरणातुन शहापुरला पाणी देण्यास आमदार हिरामण खोसकर यांनी विरोध दर्शवला.
ठळक मुद्देनांदूरवैद्य : मंत्रालयात जलसंपदा मंत्री यांच्या बैठकीत झाली चर्चा