चार दशकांचा ‘त्र्यंबकचा राजा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:07+5:302021-09-12T04:17:07+5:30
वर्षा ऋतूतील भाद्रपद महिन्यात सन १९८१ मध्ये नशिब मित्रमंडळाची स्थापना मंगेश विश्वनाथ धारणे व सहकारी मित्र ...
वर्षा ऋतूतील भाद्रपद महिन्यात सन १९८१ मध्ये नशिब मित्रमंडळाची स्थापना मंगेश विश्वनाथ धारणे व सहकारी मित्र परिवाराने केली. मंडळाने विविध उपक्रम आपल्या ४१ वर्षांच्या कालखंडात राबवलेले आहेत. त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी असलेले इंद्रतीर्थ पाणवेलींनी गच्च भरले होते. या सुंदर जलाशयाभोवती आठही दिशांना कचऱ्याचे साम्राज्य होते. प्रदूषण वाढले होते. अस्वच्छता वाढली होती. मंडळाने इंद्राळेश्वर तलाव व परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. संपूर्ण इंद्राळेश्वर पाणवेलींनी मुक्त व परिसर स्वच्छ केला. यानंतर गावातील अनेक सेवाभावी संस्थांनी या उपक्रमात भाग घेऊन हा परिसर पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त केला आहे.
सांस्कृतिक क्षेत्रात हौशी नाटके या मंडळाने आणली आहेत. गेल्या दोन दशकांपासून दहा हजार लिटर्सच्या जलकुंभातून ग्रामीण भागातील लोकांना वर्षभर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंडळाने केली आहे. त्र्यंबक नगरीच्या पंचक्रोशीत सामाजिक, सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवण्याचे काम मृत्युंजय प्रतिष्ठान करत आहे. माघी गणेश जन्मोत्सव व भागवत समाप्तीला असे वर्षातून दोन वेळा अन्नदान व अनधान्य वाटप करण्यात येते. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता ओळखून संस्थेतर्फे तीन कायमस्वरूपी ऑक्सिजन सिलिंडर उपजिल्हा रुग्णालयात भेट देण्यात आले.