नांदूरवैद्य : एकिकडे इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासन एकजुटीने कोरोनाचा सामना करत आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्ण व क्वॉरांटाईन केलेल्या व्यक्तींना ज्या एकलव्य आधार आश्रम येथे तयार केलेल्या क्वॉरांटाईन कक्षात ठेवण्यात आहे तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे कक्षातील रु ग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात देखील कोरोनाने शिरकाव केल्यामुळे कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना इगतपुरी येथील एकलव्य आधार आश्रम येथे तयार केलेल्या क्वारांटाईन कक्षात व आयसोलेशन विभागात ठेवले जाते. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे येथे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले. त्याचप्रमाणे या ठिकाणी क्वॉरण्टाइन कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींना वेळेवर चहा, नाश्ता, जेवण मिळत नसल्याची ओरड आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी, स्वच्छता, तसेच निर्जंतुकीकरणासाठी जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रूग्णांसाठी प्रशासनाने येथील एकलव्य आधार आश्रम येथे क्वारांटाईन कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. परंतू या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून यामध्ये वेळीच सुधारणा करून रूग्णांना चांगली सेवा देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांसह क्वारांटाईन कक्षातील रु ग्णांनी केली आहे.प्रतिक्रि या...इगतपुरी तालुक्यात ग्रामीण भागासह शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना दुसरीकडे रु ग्णांना ठेवण्यात आलेल्या एकलव्य आधार आश्रमातील क्वारांटाईन कक्षातील रु ग्णांना गुन्हेगारासारखी वागवणूक देत आहे. रूग्णांच्या व्यथा जाणून घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात.- तुकाराम सहाणे. सामाजिक कार्यकर्ते.दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात रु ग्णांची संख्या वाढत असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात व्यवस्था कोलमडली असली तरी या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून रोजच स्वच्छता ठेवली जात आहे. रु ग्णांना वेळेवर चहा, जेवण देण्यात येते. तसेच इतर कर्मचारी अहवालाच्या कामात व्यस्त असतात. या कक्षाला दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या टिमने सर्वात्तम क्वॉरांटाईन कक्ष म्हणून मान्यता दिली आहे.- बी.एम. देशमुख. वैद्यकीय अधिकारी, इगतपुरी तालुका.
इगतपुरी येथील क्वारांटाईन कक्षात घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 3:23 PM
नांदूरवैद्य : एकिकडे इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासन एकजुटीने कोरोनाचा सामना करत आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्ण व क्वॉरांटाईन केलेल्या व्यक्तींना ज्या एकलव्य आधार आश्रम येथे तयार केलेल्या क्वॉरांटाईन कक्षात ठेवण्यात आहे तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे कक्षातील रु ग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देरु ग्णांच्या आरोग्याचा प्रश्न : वेळेवर जेवण मिळत नसल्याची तक्र ार