येवल्याच्या अर्थव्यवस्थेत भर घालत एकोपा जपणारा पतंगोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:21 PM2020-01-15T22:21:49+5:302020-01-16T00:35:28+5:30
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मानव सृष्टीवरील सामूहिक जीवन, खिलाडूवृत्ती व कौटुंबिक ओढ जोपासणारा रोजगाराभिमुख पतंगोत्सव हल्ली अधिकच जोमाने व जोशात साजरा होत आहे. विशेषत: येवल्यात पतंग व आसारी खरेदी-विक्र ी व पतंगाशी संबंधित व्यवसाय बहरले आहेत. परिणामी येवल्याच्या अर्थव्यवस्थेत या उत्सवामुळे भर पडत आहे. लाखो रुपयांची उलाढाल तीन दिवसांत होत असून, अनेक कुटुंबांची चूलही या सणानिमित्त पेटते आहे.
दत्ता महाले ।
येवला : मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मानव सृष्टीवरील सामूहिक जीवन, खिलाडूवृत्ती व कौटुंबिक ओढ जोपासणारा रोजगाराभिमुख पतंगोत्सव हल्ली अधिकच जोमाने व जोशात साजरा होत आहे. विशेषत: येवल्यात पतंग व आसारी खरेदी-विक्र ी व पतंगाशी संबंधित व्यवसाय बहरले आहेत. परिणामी येवल्याच्या अर्थव्यवस्थेत या उत्सवामुळे भर पडत आहे. लाखो रुपयांची उलाढाल तीन दिवसांत होत असून, अनेक कुटुंबांची चूलही या सणानिमित्त पेटते आहे.
मध्यंतरीच्या काळात पतंगोत्सवात शौकिनांना पतंग उडविण्यासाठी चांगली गुणवत्ता असलेले काठभरीव पतंगदेखील वेळेवर उपलब्ध होत नव्हते. परंतु पुन्हा पंतगोत्सावाकडे, मनोरंजनासह धार्मिक अधिष्ठान, सामाजिक एकोपा, संस्कृती जोपासण्यासह उत्तम रोजगाराभिमुख उत्सव म्हणून पाहिले जात आहे. जानेवारीतील संक्र ांत आटोपली की एप्रिल महिन्यापासूनच येवल्यातील ५० ते ६० कुटुंबे पुढील संक्र ांतीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून पतंग बनवण्याच्या तयारीला लागतात. या पतंगासाठी कमान व दट्ट्या (पतंगाची उभी काडी) शिलण्याचे काम सुरू होते. संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात गर्क होते. पतंगाच्या कमाईवर चरितार्थदेखील चांगल्या प्रकारे चालतो. खास खासियत असलेल्या येवल्याच्या काठभरीव पतंगीला मागणीसह भावही चांगला मिळतो. बुरु ड समाजातील कुटुंबेदेखील बांबूपासून तयार केल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध असाºया तयार करण्याच्या उद्योगापासून चांगल्या प्रकारची कमाई होते. हिरवागार ओला बांबू आसारी तयार करण्यासाठी लागतो. मासी, चेवली, हिरवा ताजा बांबू वापरून चार, आठ, सहा, दहा पाती असाºया तयार केल्या जातात. या आसऱ्यांची किंमत ९० रुपयांपासून २६० रु पयांपर्र्यंत आहे. याशिवाय येवल्याच्या विणकरी व्यवसायासाठी पैठणी तयार करताना रेशीम उकलण्यासाठी आसारी आवश्यक असून, गेल्या १५० ते २०० वर्षांपासून येवल्यात वापरली जाते. त्यामुळे बुरु ड समाजबांधवांना वर्षभर फुरसत नसते. आता स्टीलचे पाइप वापरूनदेखील आसारी तयार करून बाजारात
विक्र ीसाठी आणली जात आहे. मांजा तयार करण्यासाठी लागणारी काच पूर्वी खलबत्त्यात कुटली जात असे. आता खलबत्त्याची जागा ग्राइंडरने घेतली आहे.
६० रु पये किलोप्रमाणे आयती काच आता उपलब्ध होत आहे. यामुळे गिरणीक्कांडप व्यवसायिकांच्या रोजगारातही भर पडली आहे. जानेवारीच्या दुसºया आठवड्यात काच कांडप व्यवसाय तेजीत असतो. सुरत, बरेली, मुंबई,अहमदाबाद येथून दोºयाची खरेदी नोव्हेंबर महिन्यातच व्यापारी करतात. एका व्यक्तीला किमान ४०० ते ५०० रु पयांचा दोरा पतंग उडवण्यासाठी लागतो. यामुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणवर होते.
भोगी, संक्र ांत व कर या तीन दिवसांत पतंगोत्सवाला उधाण येते. परगावी वा परदेशात असणारी व्यक्तीदेखील आपल्या माहेरी म्हणजे येवला येथे येतात. व्यवसाय व नोकरीनिमित्ताने दूर गेलेले सर्व मित्र कंपनी व कुटुंबातील सदस्य एकत्रित भेटतात.
पतंगोत्सवाच्या निमित्ताने महिलादेखील मनमुराद आनंद लुटतात. ध्वनिक्षेपक, हलकडी, बॅण्डच्या तालावर पतंगोत्सवाची मजा घेतली जाते. तसेच घरांच्या छतावर अनेक टेपरेकॉर्डर लावले जातात. पंतग काटली की वकाटचा होणारा जल्लोष काही वेगळीच प्रेरणा देत असतो. रात्रीच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी होत असते. यामुळे फटाका व्यावसायिकांचेही व्यवसाय तेजीत येतात. त्यामुळे सांस्कृतिक आधार, रोजगाराभिमुख पतंगोत्सवाचे धार्मिक महत्त्व व स्नेहभाव जोपासणारा हा सण येवल्याचे अर्थचक्र गतिमान करतो आहे हे मात्र, निश्चित.
नाशिक जिल्ह्यातील व्यापारी येवल्यात येऊन पतंग
विक्र ीसाठी घेऊन जातात. त्यामुळे संक्र ांत आटोपताच मार्च महिन्यापासून पतंग तयार करण्याचा व्यवसाय सुरू करावा लागतो. या व्यवसायात घरातील प्रत्येक माणूस मदत करतो. त्यामुळे आम्ही पतंगशौकिनांची गरज भागवू शकतो. एवढे करूनही अनेक लोक पतंग न मिळाल्याने नाराजही होतात. पतंगोत्सवात मोठी उलाढाल होत असल्याने व्यवसायाचे समाधान लाभते. - राहुल भावसार, पतंग व्यावसायिक
असे आहेत आसारीचे दर
सहा पाती (लहान) - १०० रु पये, सहा पाती (मोठी) - १५० रु पये, आठ पाती (लहान)- २५० रु पये, आठ पाती (मोठी) - ३०० रु पये
पतंगाचे दर (शेकडा)
अर्धीचा (पांढरा) पतंग - ४०० रु . अर्धीचा (रंगीत) पतंग - ६०० रु. कटपाउनचा पतंग - ८०० रुपये, पाऊनचा पतंग - १००० रु पये, सव्वाचा पतंग - ३५०० रु पये