नांदूरशिंगोटेत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी संजीवनी सप्ताह साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 01:27 PM2020-07-08T13:27:32+5:302020-07-08T13:28:01+5:30
नांदूरशिंगोटे : कृषी विभागाकडूनमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी संजिवनी सप्ताह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा करण्यात आला.
नांदूरशिंगोटे : कृषी विभागाकडूनमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी संजिवनी सप्ताह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा करण्यात आला. यावेळी शेवगा लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नांदूरशिंगोटे मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील विकास संस्थेचे माजी अध्यक्ष संजय आव्हाड यांच्या शेतावर कृषीदिन साजरा करण्यात आला. शासनाच्या व्यापक जनजागृती मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्र मात निफाडचे उपविभागीय अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, कृषी सहायक दादासाहेब जोशी आदींसह कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आव्हाड यांच्या शेतात शेवगा लागवडीची पाहणी करण्यात आली.उपविभागीय कृषी अधिकारी वाघ यांनी शेवगा लागवडीचे महत्त्व व त्यावर येणाºया कीड व रोग याबाबत माहिती दिली. तसेच दोडी बुद्रुक येथील ब्रम्हानंद स्वामी अँग्रो कंपनीला भेट देवून कृषी दिनाचे महत्त्व पटवून दिले. कंपनीचे संचालक वसंत आव्हाड यांनी हरभरा दाळी पासून बनविण्यात येणारे पदार्थ याबाबत कृषी अधिकाºयांना माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी गागरे यांनी शेतकर्यांना कडधान्याचे महत्त्व पटवून दिले. तालुक्यातील सर्व कृषी मंडळातील मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.