औद्योगिक क्षेत्र बंद ठेवण्याची कामगार मंचची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:14 AM2021-04-18T04:14:15+5:302021-04-18T04:14:15+5:30
कोरोना आजाराची वाढती व्याप्ती थांबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू केला असतांना औद्योगिक ...
कोरोना आजाराची वाढती व्याप्ती थांबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू केला असतांना औद्योगिक क्षेत्रातील उद्योगात शासनाच्या सर्व निर्बंधांना डावलून कामकाज सुरू आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. अनेक कामगारांचा मृत्यू देखील झाला आहे. कामगारांचे कुटुंब बेसहारा होत आहे. सध्याची परिस्थिती पाहता संसर्ग झालेल्या कामगारांना हॉस्पिटल आणि औषधोपचार सुद्धा उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे आजारपणासाठी लागणारा लाखोंचा खर्च करण्याची कुवत सर्वसामान्य कामगारांची नाही. कारखान्यातील कामगार कोरोनाबाधित होत असल्याने आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी,कामगार व कुटुंबीयांची सुरक्षितता व हित लक्षात घेता औद्योगिक क्षेत्रातील कारखाने त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात यावेत. अन्यथा सर्व कामगार हे कामगार विकास मंचच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना निवेदनाद्वारे मंचचे कैलास मोरे, महिद्र अँड महिद्र युनियनचे अध्यक्ष नितीन जाधव, संजय घोडके, संजय घुगे, लिअर कंपनीचे नंदू गायकवाड, गॅब्रिअलचे युनियनचे लालचंद साळुंखे, किर्लोस्कर युनियनचे महेश पाटील, किम्पप्लास्टचे प्रवीण मोरे, ॲडव्हान्स एंझाईमचे चंद्रकांत डगळे, केएसबी पम्पचे झनकर आदींनी दिला आहे.