प्रेस निवडणुकीत कामगार पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:08 AM2018-03-13T00:08:30+5:302018-03-13T00:08:30+5:30
भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने सर्व २९ जागांवर विजय संपादित करून निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. आपला पॅनलचा साफ धुव्वा उडाला आहे.
नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने सर्व २९ जागांवर विजय संपादित करून निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. आपला पॅनलचा साफ धुव्वा उडाला आहे. भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणाल-यातील मजदूर संघाच्या अध्यक्षपदी हिंद मजदूर सभेचे राष्टÑीय खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. मजदूर संघाच्या १३ पदाधिकारी व १६ कार्यकारिणी सदस्य अशा २९ जागांसाठी शनिवारी ९५ टक्के मतदान झाले होते. रविवारी सकाळी आयएसपी रेस्ट हेड येथे मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीमध्ये पहिल्यापासून कामगार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी आघाडी मिळवली होती. मध्यरात्री बाद मतपत्रिकेवर हरकत घेण्यात आल्याने पहाटे ३ वाजता मत मोजणीचा निकाल लागला.
उमेदवारांना मिळालेली मते
मजदूर संघ सरचिटणीस जगदीश गोडसे (१९८७), कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे (२१००), उपाध्यक्ष ४ जागा - सुनील आहिरे (१९०१), दिनकर खर्जुल (१७०९), राजेश टाकेकर (१९३२), केरू पाळदे (१६४५), जॉर्इंट सेक्रेटरी ६ जागा - शिवाजी कदम (१८०१), जयराम कोठुळे (१७६३), रमेश खुळे (१७४८), कार्तिक डांगे (१७७७), उल्हास भालेराव (१५८७), इरफान शेख (१६३३), खजिनदार - उत्तम रकिबे (१८१३), कार्यकारिणी सदस्य १६ जागा - शरद अरिंगळे (१८२४), सुरेश आढाव (१८२५), अरुण गिते (१८४२), संजय गुंजाळ (१६५०), संपत घुगे (१७८८), सुदाम चौरे (१७०३), प्रकाश जगताप (१६४९), राजू जगताप (१६६४), कचरू ताजनपुरे (१७५६), संतोष ताजनपुरे (१६६६), अनिल थोरात (१६८०), अविनाश देवरूखकर (१७४८), भगवान बिडवे (१६५८), अरुण भोळे (१५६१), संदीप व्यवहारे (१७०२), मनोज सोनवणे (१६६९) मते मिळवुन विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माधवराव भणगे यांनी काम पाहिले.
जोरदार आनंदोत्सव
मजदूर संघाच्या निवडणुकीत कामगार पॅनलने निर्विवाद विजय मिळवत असल्याचे चित्र स्पष्ट होताच रविवारी सायंकाळपासून पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाके फोडून जोरदार आनंदोत्सव साजरा केला.
पॅनलची ताकद वाढली
गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा पॅनलला जास्त मते मिळाले असून, ताकद वाढल्याचे निकालातून दिसत आहे. प्रेसच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पैशाचा वापर करण्यात आला. गेल्या ईपीएफ निवडणुकीपासून सत्ताधाºयांनीच कामगार चळवळीत राजकीय प्रतिनिधींना आणले. - रामभाऊ जगताप, आपला पॅनल
कामाची पावती
गेल्या सहा वर्षांपासून कामगारांच्या हिताचे घेतलेल्या निर्णयाची पावती कामगारांनी लोकशाही पद्धतीने दिली. प्रतिस्पर्ध्यांनी प्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय पक्षाचे राजकारण आणले. मात्र कामगारांनी कामगार चळवळीप्रमाणेच उत्तर दिले. - जगदीश गोडसे,
कामगार पॅनल