१३० वर्षांची परंपरा सांगणाऱ्या कॉँग्रेस पक्षाला आलेली मरगळ व पुरेशा साधनसामग्रीचाअभाव असतानाही नाशिक जिल्ह्यातील एक जागा राखण्यात कॉँग्रेसला यश मिळाले आहे तर अन्य तीन जागांवर पक्षाने दुसºया क्रमांकाची मते घेऊन पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात कॉँग्रेसची कधी नव्हती इतकी वाईट परिस्थिती सध्या झाली असून, नेत्यांपुरताच पक्ष उरलेला असताना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी पक्षांतर करून सेनेची वाट धरली त्यामुळे अवघ्या दोन जागा ताब्यात असलेल्या कॉँग्रेसचा एकमेव आमदार जिल्ह्यात शिल्लक राहिला. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या कॉँग्रेसने जिल्ह्यातील पाच जागा लढण्याचे धाडस केले. कॉँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या मालेगाव मध्यमधून पुन्हा विद्यमान आमदार आसिफ शेख, चांदवडमधून माजी आमदार शिरीष कोतवाल, मध्य मतदारसंघातून डॉ. हेमलता पाटील, इगतपुरीतून हिरामण खोसकर व पूर्व मतदारसंघ कवाडे गटाला सोडण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघातून उमेदवारी केली. निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादीच्या नेत्यांनीच खोसकर यांना कॉँग्रेसकडे पाठविले व विशेष म्हणजे खोसकर यांनी एकतर्फी विजय मिळविला; मात्र मालेगाव मध्य हा बालेकिल्ला कॉँग्रेसने गमावला.
साधनसामग्रीचा अभाव; तरीही कॉँग्रेस लढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 1:32 AM