मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने सोमवार बाजार येथे व्यापारी संकुल व बाजार ओटे बीओटी तत्त्वावर विकसित करण्यात आले आहेत. गाळेवाटपाबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, या ठिकाणी विविध सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे. महानगरपालिकेच्या वतीने सोमवार बाजार व्यापारी संकुल उभारण्याच्या मंजूर विकास आराखड्याप्रमाणे विविध सोयीसुविधा तत्काळ गाळेधारकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्लेवर ब्लॉक बसविणे, स्ट्रीटलाईट व संकुलातील कॉमन जागेत लाईट व्यवस्था करणे, गटारी दुरुस्त करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, नियमित स्वच्छता करण्यासाठी आरोग्य विभागास आदेश देणे, सार्वजनिक स्वच्छतागृह निर्माण करणे आवश्यक आहे. भाजी बाजार ओटे वितरित करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने दक्षता घेतली जात नसून धोरणात्मक निर्णय घेऊन परवडेल अशा दरात ओटे वितरित करण्याची गरज आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने भायगाव, चर्च गेट नामपूर रस्त्यावर भरणारा बाजार व्यापारी संकुलातील ओट्यावर बसविण्यासाठी योग्य उपाययोजना तत्काळ करण्याची गरज असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने कॅम्प भागातील अतिक्रमण, वाहतूककोंडी व इतर समस्या सुटू शकतात, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी निखिल पवार, कुंदन चव्हाण, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर पवार, दादा बहिरम, राजेंद्र पाटील, प्रवीण चौधरी, अतुल लोढा, सुशांत कुलकर्णी, अनिल पाटील, दिनेश काळे, नीलेश गुंजाळ, आप्पाजी महाले, अझीम शेख आदी उपस्थित होते.
इन्फो
भायगाव रस्त्यावर वाहतूककोंडी
सोमवार बाजार व्यापारी संकुलातील काही स्टॉल मटण व मासे विक्री व्यावसायिकांना राखीव ठेवण्यात आले असून, ती जागा त्या व्यवसायासाठी अयोग्य आहे. सोमवार बाजार चौक ते रावळगाव नाका तसेच भायगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हातगाड्या उभ्या राहतात. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होऊन छोटेमोठे अपघात नियमित घडत असतात. काही ठिकाणी विद्युत पोलदेखील रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. रस्त्यावरच रिक्षा थांबे व वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे कॅम्प भागातील महत्त्वाच्या भागाचा म्हणावा तसा विकास व कायापालट होऊ शकला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.