तरणतलावात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:41 AM2019-09-14T00:41:35+5:302019-09-14T00:42:13+5:30

महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था, तुटलेले शॉवर, मोडकळीस जाळ्या यांसह अनेक समस्या सातपूर येथील तरणतलावमध्ये असून, या समस्या सोडविण्याबरोबरच प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पोहण्यासाठी येणाऱ्या महिला व नागरिकांनी केली आहे.

 Lack of facilities in swimming pool | तरणतलावात सुविधांचा अभाव

तरणतलावात सुविधांचा अभाव

Next

सातपूर : महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था, तुटलेले शॉवर, मोडकळीस जाळ्या यांसह अनेक समस्या सातपूर येथील तरणतलावमध्ये असून, या समस्या सोडविण्याबरोबरच प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पोहण्यासाठी येणाऱ्या महिला व नागरिकांनी केली आहे.
सातपूर येथील क्लबहाउसमधील महापालिकेच्या तरणतलावात दररोज शेकडो आजीव महिला-पुरु ष सभासद स्विमिंगसाठी येतात. महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. तरीही साध्या प्राथमिक सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जात नाहीत त्यात महिला व पुरु ष सभासदांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झालेली आहे. तलाव परिसरातील जाळ्या तुटलेल्या आहेत. काही शॉवर तुटलेले आहेत, तर काही बंद पडलेले आहेत. परिसरात झाडी-झुडपी अस्ताव्यस्त वाढलेली आहेत. तलावाचे छप्पर (डोम)चे पत्रे तुटलेले आहेत. पत्रे अंगावर पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असल्याने नियमित साफसफाई करण्यात यावी. डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी. फ्लोअरिंग उखडलेली आहे.
तलाव परिसरातील रबरी मॅट बदलण्यात याव्यात आदी समस्या सोडविण्याबरोबर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शंकर पाटील, बजरंग शिंदे, भाऊलाल पाटील, एस. व्ही. जगताप, जी. बी. गायकवाड, पी. जी. शिरोडे, दिलीप भंदुरे, गणेश झनकर, गौतम खरे, बाळासाहेब पोरजे, पराग कुलकर्णी, दिलीप गिरासे, बाळासाहेब रायते, आबा महाजन, मनोज साळुंखे आदींसह सभासदांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
वेगळ्या तरणतलावाची गरज
सातपूर येथील महापालिकेच्या तरणतलावाचे ५००च्या आसपास महिला व पुरु ष आजीव सभासद आहेत. ३००च्या जवळपास वार्षिक सभासद आहेत. समर कॅम्पमध्ये ५५० च्यावर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. दररोज येणारे पासधारक सभासद वेगळे. एवढी सभासद संख्या पाहता या ठिकाणी अजून एक तरणतलावाची आवश्यकता आहे. महिला सभासदांसाठी वेगळ्या तरणतलावाची गरज आहे. त्यातून महापालिकेला त्या प्रमाणात उत्पन्नही मिळेल, असेही सभासदांचे म्हणणे आहे.

Web Title:  Lack of facilities in swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.