नायगाव खोऱ्यातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सोनगिरी व जोगलटेंभी आदी गावांतील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी, तसेच नाशिक, नाशिक रोड व अन्य ठिकाणी प्रवास करताना एसटीअभावी कुचंबणा होत आहे. या मार्गावर खासगी वाहतूकही बंद असल्याने, प्रवाशांना तासंतास थांबून वेळ व आर्थिक भार सोसावा लागत आहे. नायगाव-नाशिक रोड मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शहरी बसच्या फेऱ्याही बंद आहेत. त्यामुळे या भागातील प्रवाशी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही लालपरीची सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांबरोबर ग्रामीण भागातून शहरी भागात व शहरी भागातून ग्रामीण भागात येणाऱ्या चाकरमानी व छोटे-मोठे व्यावसायिक व शेतकरी करत आहे.
फोटो = ११ सिन्नर प्रवाशी
नायगाव-सिन्नर रस्त्यावर वाहनाची वाट पाहणारे प्रवासी.
110921\11nsk_23_11092021_13.jpg
फोटो = ११ सिन्नर प्रवाशी नायगाव - सिन्नर रस्त्यावर वाहनाची वाट पाहणारे प्रवाशी.