लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : तालुक्यातील भोयेगाव येथे चोरट्यांनी कांदा रोप चोरून नेले आहे. रोप चोरीची सततच्या घटनांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत.मंगळवारी (दि. १) रात्रीच्या सुमारास भोयेगाव येथे ह.भ.प.दौलत महाराज ठोंबरे यांच्या मळ्यात कांदा लागवडीसाठी उत्कृष्ट तयार असलेले कांदा रोप ४-५ वाफे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. कालपर्यंत ठोंबरे यांच्या मळ्यात कांदा लागवड चालू होती; पण त्या नंतर दैनंदिन शेतीचे कामे आवरून सर्व जण घरी गेले, दिवसभर काम करून दमलेले सर्व शेतकरी झोपी गेले असताना रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी रोप गायब केले. सकाळी उठून जेव्हा कांदा लागण करण्यासाठी लवकर माणसं लवकर येणार असल्याने दौलत महाराज मळ्यात गेले तेव्हा बघितले तर ४ ते ५ वाफे किमान एक बिघाभर कांदे लागवड होतील असे उत्कृष्ट कांदा रोप अज्ञात व्यक्तींनी उपटून चोरून नेले. असा दुसरा प्रकार या गावात घडल्याने इतर शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. या घटनेने ठोंबरे हवालादिल झाले आहेत. एकतर कांदा उळे मिळत नाही. ते मिळाले तर कांदा रोप हे या सतत रिपरिप पावसाने मरून जाताना. या वातावरणात कसेतरी तयार करून शेवटी ऐनवेळी हे रोप चोरी जाणे हे शेतकऱ्यांनी कसे सहन करावे, हे फक्त शेतकरीच सांगू शकतील. कारण रोप टिकत नसताना इतके मोलामहागाचे रोप चोरी जाणे म्हणजे लाखो रु पयांचा तोटा शेतकºयांना सहन करावा लागत आहे. मग या सर्वसाधारण शेतकºयांनी दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न उभा राहिला आहे.
अज्ञात चोरट्यांकडून कांदा रोप लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 10:50 PM
चांदवड : तालुक्यातील भोयेगाव येथे चोरट्यांनी कांदा रोप चोरून नेले आहे. रोप चोरीची सततच्या घटनांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ठळक मुद्देभोयगाव येथील घटना : सततच्या चोरीच्या घटनांनी शेतकरी हवालदिल