लासलगावी पावसाने मका भिजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:38 PM2017-12-05T16:38:34+5:302017-12-05T16:38:44+5:30
लासलगाव- परिसरात ढगाळ हवामान आणि पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी हे संकटात सापडले आहे.तसेच बाजार समिती आवारात विक्रीसाठी आणलेला मका ओला झाल्याने नुकसान झाले आहे.
लासलगाव- परिसरात ढगाळ हवामान आणि पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी हे संकटात सापडले आहे.तसेच बाजार समिती आवारात विक्रीसाठी आणलेला मका ओला झाल्याने नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या कांदा उत्पादकांचे मोठे हाल झाले. काढणीला आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान होणार असून त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होणार असून काढणीला आलेल्या द्राक्षाचे मोठे नुकसान होऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. आज येथे बाजार समितीत हजाराहून अधिक कांद्याची वाहनेही लिलावासाठी दाखल झाले होते. सकाळच्या सत्रात लिलाव सुरु होतात, मात्र पावसाने जोर वाढल्याने दुपारी बारा ते अडीच वाजेच्या दरम्यान कांदा लिलाव थांबविण्यात आले होते.या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकºयांची चिंता वाढली आहे , ढगाळ हवामान आणि पावसामुळे शेतीपुढील संकट वाढले आहे. द्राक्ष, कांदा या फळपिकांना या वातावरणाचा फटका बसणार आहे.