लासलगावहून मुंबईला रेल्वेने भाजीपाला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 02:36 PM2019-12-19T14:36:19+5:302019-12-19T14:36:38+5:30
लासलगाव : येथील रेल्वे स्थानकावरून दोन वर्षांनंतर मुंबईकडे भाजीपाला रेल्वेने रवाना झाला. भाजीपाला पार्सल सुविधा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
लासलगाव : येथील रेल्वे स्थानकावरून दोन वर्षांनंतर मुंबईकडे भाजीपाला रेल्वेने रवाना झाला. भाजीपाला पार्सल सुविधा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गुरूवारी पहिल्याच दिवशी सुमारे ११०० किलो भाजीपाला लासलगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे रवाना झाला. लासलगाव रेल्वे स्थानकावर गुरूवारी सकाळी नऊ वाजता मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसने भाजीपाला पार्सल सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे , बाळासाहेब सोनवणे , हरिष गवळी, लासलगाव रेल्वेचे पार्सल बुकिंग अधिकारी आर एस गोसावी , शहाजी ठाकरे, हेमंत भागवत, दत्तू सुराशे, संतोष शिंदे यांच्यासह व्यापारी व शेतकरी या वेळी उपस्थित होते. भाजीपाला पार्सल सुविधा लासलगाव रेल्वे स्थानकावर सुरू झाल्याने रेल्वेला पुन्हा एकदा चांगले उत्पन्न मिळणार असून यानिमित्ताने हमाल , मालवाहतूक करणारे वाहनचालक यांनाही रोजगार सुरू झाला आहे. शिवा सुरासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून या पार्सल सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.