लासलगावी कांदा १७ रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:03 AM2018-02-01T01:03:32+5:302018-02-01T01:03:58+5:30
किमान निर्यातमूल्य कमी केल्यानंतरही अपेक्षित निर्यात न वाढल्याने व मोठी आवक झाल्याने बुधवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात कमाल ५००, तर सरासरी ३०० रुपयांची घसरण झाली. दर घसरल्याने देवळा, सटाण्यात राष्टÑवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लासलगाव : किमान निर्यातमूल्य कमी केल्यानंतरही अपेक्षित निर्यात न वाढल्याने व मोठी आवक झाल्याने बुधवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात कमाल ५००, तर सरासरी ३०० रुपयांची घसरण झाली. दर घसरल्याने देवळा, सटाण्यात राष्टÑवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लाल कांद्याची ६०० वाहनांतून आवक झाली. बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ९५०, कमाल १,९०५ तर सरासरी १,६५० रूपये होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १,२०० रुपयांची घसरण झाली. कांदा क्विंटलमागे दोन हजार रुपयांच्या आत आल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ८५ हजार ५४४ क्विंटल आवक होऊन किमान भाव एक हजार तर कमाल भाव ३,१५८ रुपये होते.
निर्यातमूल्य कमी करूनही घसरण कायम
गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यांतील बाजारपेठेत नवीन कांदा मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने तेजीत असलेल्या कांद्याचे दर सोमवारपासून घसरत आहेत. किमान निर्यातमूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन झाल्यानंतर भाव वाढत नसल्याचे चित्र आहे. राज्यात लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने लासलगाव बाजारपेठेतही कांदा घसरला. कांद्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्याच्या निषेधार्थ बुधवारी नाशिक जिल्ह्णातील देवळा, सटाण्यात राष्टÑवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदा निर्यात शुल्क, शेतमाल आॅनलाईन खरेदी आदी विविध मागण्यांसाठी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.