लासलगावी कांदा आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 01:13 AM2020-11-28T01:13:40+5:302020-11-28T01:14:23+5:30
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा व लाल कांदा आवक वाढली असून, उन्हाळा कांदा दरात ४००, तर लाल कांदा दरात ६०० रुपयांची घसरण झाली. बाजारभाव कमी झाल्याने कांदा उत्पादकांनी संताप व्यक्त केला आहे.
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा व लाल कांदा आवक वाढली असून, उन्हाळा कांदा दरात ४००, तर लाल कांदा दरात ६०० रुपयांची घसरण झाली. बाजारभाव कमी झाल्याने कांदा उत्पादकांनी संताप व्यक्त केला आहे.
शुक्रवारी (दि.२७) बाजार समिती आवारात १० हजार ९८५ क्विंटल कांदा आवक होऊन दर ९०० ते ३,३६० आणि सरासरी २,५०० रुपये राहिले, तर २,५३० क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन ९०० ते ३,९०० रुपये दराने विक्री झाला. गुरुवारी (दि. २६) आवारात ९९७ वाहनातील उन्हाळ कांद्याची ११ हजार ९५ क्विंटल आवक होऊन दर ८०१ ते ३,७२० व सरासरी २९०० रुपये, तर १,१४५ क्विंटल लाल कांदा आवक होऊन किमान ९०० ते ४,५०० व सरासरी ३,५०१ रुपये दराने विक्री झाला.