महामार्गावरील अनेक झाडं मोजताय अखेरच्या घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 04:00 PM2019-03-03T16:00:40+5:302019-03-03T16:01:18+5:30
ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झाडांच्या केवळ काड्या उरल्या आहेत.
ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झाडांच्या केवळ काड्या उरल्या आहेत.रोपटं लहान असल्याने त्यास आधार म्हणून आजूबाजूस संरक्षण जाळ्या बसवल्या जातात,एकदा ते स्वत: उभे राहिले की त्या जाळ्या काढून ते मोठे होत जाते.परंतु इकडे तर सुरवातीच्या वेळीच अनेक झाडे कोलमांडून जात आहेत.येथे झाडांपेक्षा जाहिरातबाजी भर दिलेला दिसतो आहे.त्यामुळे आगामी काळात येथे सगळेच ओसाड झाले तर वावगे वाटू नये.पूर्वी महामार्ग एकेरी होता त्यामुळे आजूबाजूस शेकडो वर्षे जुनी झाडे होती.कालांतराने वाहन संख्या वाढल्याने दुपदरीचे रूपांतर सहापदरीत झाले.परिणामी सामाजिक बांधिलकी दाखवत एका राष्ट्रीयकृत खासगी बँकेने पुढाकार घेत हजारो रोपटं लावली.काही दिवस आजूबाजूस सर्वच हिरेगार होते.सध्या उन्हाळा तोंड वर काढत असताना सदरची झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत.आज अनेक सामाजिक स्तरावर वनराई वाढवण्यावर भर देत असताना महामार्गावरील झाडे अखेरच्या घटका मोजत आहे.याकडे संबंधित प्रशासनाने योग्य ते लक्ष घालण्याची गरज आहे.अनेक ठिकाणी न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटींची नियमाप्रमाणे अंमलबजावणी होत आहे का हे देखील तपासून पाहणे तितकेच गरजेचे बनले आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन मार्ग होण्यापूर्वी किती झाडं होती ती किती जुनी होती आण ित्या टक्त्यावर आज मितीस ग्रीन हायवेच्या नावाखाली किती जिवंत आहे याचा हिशोब झाला पाहिजे. जे लहान वृक्ष जगले ते आपले जे नाही त्यांचं नशीब खराब अशी मानिसकता नकोच.उन्हाळ्याच्या तोंडावर त्यांची निगा राखणे,त्यांना वेळोवेळी पाणी देणे,जेथे झाडं पूर्णपणे वाळून गेलेली आहे त्यांच्या जागी नवीन रोप लावावे अशी मागणी परिसरातील निसर्ग प्रेमींनी केली आहे.