नांदगाव : आवाजातला गोडवा आणि तिच्याकडे असलेला अहिराणी गाण्यांचा खजिना हीच तिची संपत्ती होती. अहिराणी गाण्यांसाठी तिला लग्नात आवर्जून निमंत्रण दिले जायचे. कुरड्या, पापडासाठी डाळ दळायची असो की, लग्नातली हळद, जात्यावरच्या ओव्या गाण्यासाठी तिला हमखास आमंत्रण असायचे. सर्वांना हवीहवीशी वाटणाऱ्या, ८० वर्षांच्या अंबाबाईला अखेर कोरोनाची दुसरी लाट या इहलोकातून दूरच्या प्रवासाला घेऊन गेली.लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. आईने दुसऱ्याशी घरोबा केल्याने तिचा बालविवाह झाला. पण तिच्या वाट्याला पुन्हा दु:खच आले. विवाहानंतर काही दिवसांनी तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर सावत्र बापाकडे आणि आईच्या आश्रयाने ती राहू लागली. काही दिवसांनी त्यांचेही निधन झाले व अंबाबाई सर्वस्वी पोरकी झाली. एकाकीपणाचे जगणे वाट्याला आले. झोपडीत राहून रोजंदारी करून ती पोटाची खळगी भरायची. दुसरा विवाह न करता ताठ मानेने, कष्टाने जीवन जगली. गेल्या वर्षी कोरोनाची लाट आली. ज्या कुटुंबांच्या सहाय्याने ती तग धरून होती. ते सगळे कोरोना बाधित झाले. त्या कुटुंबातील तीन लोक कोरोनाने मृत झाले आणि तिचा आधारच तुटला. कोरोनाच्या दहशतीमुळे ती अजून एकाकी पडली. कोणी तिच्याजवळ जात नव्हते. एके दिवशी सामाजिक कामात झोकून देणारा नांदगावचा तरूण सुमित सोनवणे याला फुलेनगरहून फोन आला. अंबाबाई आजारी असल्याचा तो फोन होता. त्यानंतर सुमित त्याचे मित्र विशाल जाधव, सुनील गायकवाड यांनी अंबाबाईला नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. रोहन बोरसे यांनी आठ दिवस उपचार करून तिला डिस्चार्ज दिला.आता उरल्या केवळ आठवणीअंबाबाईला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती रस्त्यावरून घरापर्यंत चालत गेली, पण तिच्या देखभालीसाठी कोणी जवळ नव्हते. गोळ्याऔषधे होती. पण जेवण न मिळाल्याने अशक्त झाली होती. तिच्या अखेरच्या दिवसात कोरोना झाला म्हणून सर्वच तिच्यापासून लांब राहत होते. सर्वांसाठी दु:खाच्या वेळी ती रडली पण तिच्या मृत्यू समयी कोरोनाचे दु:ख सोबतीला होते. अखेर अंबाबाई दूरच्या प्रवासाला निघून गेली. आता उरल्या फक्त तिच्या आठवणी.
गोड गळ्याच्या अंबाबाईची अखेरची कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:06 PM
नांदगाव : आवाजातला गोडवा आणि तिच्याकडे असलेला अहिराणी गाण्यांचा खजिना हीच तिची संपत्ती होती. अहिराणी गाण्यांसाठी तिला लग्नात आवर्जून निमंत्रण दिले जायचे. कुरड्या, पापडासाठी डाळ दळायची असो की, लग्नातली हळद, जात्यावरच्या ओव्या गाण्यासाठी तिला हमखास आमंत्रण असायचे. सर्वांना हवीहवीशी वाटणाऱ्या, ८० वर्षांच्या अंबाबाईला अखेर कोरोनाची दुसरी लाट या इहलोकातून दूरच्या प्रवासाला घेऊन गेली.
ठळक मुद्देनांदगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत इहलोक सोडला