लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाने येवल्यात हिंसक वळण घेतले. दूध, भाजीपाल्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या मालाच्या गाड्या ठिकठिकाणी अडवून माल रस्त्यावर फेकण्यात आला. अंतराअंतराने पुन्हा पुन्हा रास्ता रोको सुरूच असल्याचे चित्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिसत होते. काही वाहनांना आग लावण्यात आल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला़ पिंपळगाव टोलनाक्यावर आडगाव, नांदेसर, पिंपळगावसह पंचक्र ोशीतील युवक शेतकरी जमले. यावेळी एमएच ४६ इ३५६८ क्र मांकाची गाडी काही शेतकर्यांनी पकडली.यात मांस असल्याचे लक्षात आल्याने आंदोलनाची ठिणगी पडली.ही गाडी पेटवण्यात आली. दरम्यान या नाक्यावर ज्या गाडी येतील त्यामधील शेतमाल काढून रस्त्यावर फेकण्यास सुरु वात झाली. काही ठिकाणी गाड्या फोडण्यात आल्या.काही ट्रकचालकाला मारहाण केल्याचे समजते.तोडफोड करण्यात आली.
येवल्यात लाठीमार
By admin | Published: June 02, 2017 12:24 AM