पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगांव बसवंतचे उपबाजार आवार पालखेड मिरचीचे येथे भुसार (मका, सोयाबीन) या शेतीमाल लिलावाचा शुभारंभ सोमवारी (दि.१२) निफाडचे आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.पिंपळगाव बाजार समितीच्या उपआवार असलेल्या पालखेड मिरचीचे येथे भुसार मालाचा शुभारंभ पार पडला. विक्र ी केलेल्या शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात २४ तासाच्या आत शेतकरी बांधवांना देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी शेतीमाल येथे विक्र ीस आणण्याचे आवाहन बनकर यांच्यासह उपसभापती व संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.शुभारंभप्रसंगी संचालक सुरेश खोडे, निवृत्ती धनवटे, शरद काळे, सरपंच रवींद्र कोकाटे, बाळासाहेब शिंदे, माधव ठोमसे, भाऊसाहेब मेधने, दशरथ जगझाप, केशव शिंदे, धनु महाले, अशोक शिंदे व्यापारी मंगेश छाजेड, पंकज बोथरा, रोशन बाफना, साखरेचंद गंगवाल, गणेश कुलकर्णी, तेजस बंब, प्रशांत शर्मा, अतिष कोचर आदी उपस्थित होते.
पालखेड उप बाजार आवारात भुसार-माल लिलावाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 6:52 PM
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगांव बसवंतचे उपबाजार आवार पालखेड मिरचीचे येथे भुसार (मका, सोयाबीन) या शेतीमाल लिलावाचा शुभारंभ सोमवारी (दि.१२) निफाडचे आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.
ठळक मुद्देपालखेड मिरचीचे येथे भुसार मालाचा शुभारंभ पार पडला.